Jump to content

अल्लादिया खाँ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अल्लादियाखाँ या पानावरून पुनर्निर्देशित)

गुलाम अहमद तथा उस्ताद अल्लादिया खान (११ ऑगस्ट, इ.स. १८५५ - १६ मार्च, इ.स. १९४६) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या जयपूर-अत्रौली घराणे या गायकीचा आविष्कार करणारे गवई होते.

जीवन व कार्य

[संपादन]

अल्लादिया खान यांचा जन्म जयपूर संस्थानातील उनियारा या गावात झाला. त्यांचे वडील ख्वाजा अहमद टोक संस्थानच्या दरबारात गवई होते. अल्लादिया खान पंधरा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर जहांगीर खान यांनी त्यांना संगीताची तालीम दिली. बारा वर्षे गायकीचे धडे घेतल्यावर अल्लादिया खान यांनी आपली पहिली मैफल अजयगड संस्थानात सादर केली. दोन वर्षे दरबारी गायक म्हणून नेपाळच्या राजाच्या दरबारातही ते राहिले. त्यानंतर ते राजस्थानातील आमलेटा संस्थानात आले. इ.स. १८९३ साली ते मुंबईला आले व त्यानंतर इ.स. १८९५ ते इ.स. १९२२ पर्यंत कोल्हापूरच्या शाहू महाराजांकडे राहिले.