Jump to content

अल्टिमेट फाइटिंग चॅम्पियनशिप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अल्टीमेट फाईटिंग चॅम्पियनशिप या पानावरून पुनर्निर्देशित)
यु एफ सी
प्रकार दुय्यम
उद्योग क्षेत्र मिक्स मार्शल आर्ट
स्थापना १९९३
मुख्यालय लास वेगास, संयुक्त राज्य अमेरिका
महत्त्वाच्या व्यक्ती डेना व्हाईट
मालक ऐंडेव्हर , सिल्व्हर लेक पार्टनर्स ,कोहोलबर्ग क्रेविस राॅबर्ट्स ,एम एस डी कॅपिटल्स (जुफा ,एल.एल.सी)
पोटकंपनी जुफा
संकेतस्थळ https://www.ufc.com

अल्टिमेट फाईटींग चॅम्पियनशिप अमेरिकेतील मिक्स मार्शल आर्ट सामने आयोजित करणारी संस्था आहे.या संस्थेचे मुख्यालय लास वेगास शहरात आहे.ही संस्था मिक्स मार्शल आर्टचे सामने आयोजीत करणारी जगातील सर्वात सुप्रसिद्ध संस्था आहे. अल्टिमेट फाईटींग चॅम्पियनशिपला यु एफ सी या नावाने सुद्धा ओळखले जाते.

इतिहास

[संपादन]

यु एफ सी ने पहिली स्पर्धा १२ नोव्हेंबर १९९३ ला आयोजित केली होती.या स्पर्धेत वेगवेगळ्या खेळ प्रकारातील खेळाळुंनी भाग घेतला नंतर या सपर्धेला यु एफ सी १ या नावाने ओळखले गेले आणि 'जू जुत्सू' फाईटर 'राईस ग्रेसी' हे अंतिम सामन्यात 'केन शेमरलोक' या फाईटर विरुद्ध विजयी झाले होते. यू.एफ.सी.१ चा मुख्य उद्देश्य हा होता की वेगवेगळ्या द्वंद्व,युध्य कलां मधून कोणती द्वंद्व कला उत्तम आहे हे शोधणे आणि पाहणे की जेव्हा मुष्टी योध्या (बाॅक्सर) समोर जेव्हा एखादा मल्ल लढेल तेव्हा काय होईल. अश्या प्रकारे वेवेगळ्या युद्ध कलेतील फाईटर एकमेकांचा सामना कसे करतील[].

जानेवारी २००१ ला जूफा कंपनीने यू.एफ.सी.ला विकत घेतले[].

नियम

[संपादन]

यू.एफ.सीचे जे सध्याचे नियम आहेत ते न्यू जर्सी एथेलिटिक आयोगाने तयार केले आहेत.

  • सामण्यान मधील फेऱ्या -

यू एफ सी सामने समण्यात्वे तीन फेऱ्यांचे असतात. प्रत्येक फेरी (राऊंड) हा पाच मिनिटांचा असतो. मुख्य पुरस्काराच्या फाइट या पाच फेऱ्यांचा असतात. त्यामध्ये सुद्धा प्रत्येक फेरी ही पाच मिनिटांनी असते.

  • केज -

यू एफ सी सामने ज्या रिंग मध्ये होतात त्याला ऑक्टेगाॅन म्हनतात.हा अष्टकोणी आकाराचा एक लोखंडी जाळी पासून आणि पाईपां पासून बनवलेला असतो.त्याला दोन दरवाजे असतात. सामण्यांन दरम्यान फक्त पंच आणि दोन फाईटर हे एवढेच ओक्टेगाॅन मध्ये असतात.आॅक्टेगाॅनच्या बाजुने बसलेले निर्नायक दोन्ही फाईटरना त्यांनी विरोधी फाईटरवर केलेल्या प्रहारांवरून गुण देतात व शेवटि ज्याला जास्त गुण मिळतात तो विजयी होतो.जर विरोधी फाईटर मुक्क्याने बेशुद्ध होऊन पडला तर विरोधी फाईटर विजयी होतो.

UFC 131 Carwin vs. JDS.jpg

ऑक्टेगाॅन यु.एफ.सी. १३१

जुनियर डाॅस सॅन्तोस विरुद्ध शेन कार्विन.

  • ऑक्टेगाॅन -

युएफसीचे सामने ज्या ठिकाणी होतात त्याला ऑक्टेगाॅन म्हनतात.खाली दिलेल्या छायेत यु.एफ.सी.ऑक्टेगाॅन दाखवलेला आहे.

यु.एफ.सी. ७४

संदर्भ

[संपादन]
  1. ^ टीम., यू एफ सी संकेतस्थळ (२८ मे २०२०). "यूएफसीचां इतिहास". यू एफ सी. यू एफ सी जुफाची संस्था. २८ मे २०२० रोजी पाहिले.
  2. ^ https://www.ufc.com/about