अकुला वर्गाच्या पाणबुड्या
Appearance
(अकुल वर्गाच्या पाणबुड्या या पानावरून पुनर्निर्देशित)
अकुला वर्ग नाटो सैन्याद्वारे रशियन आण्विक शक्तीने चालणाऱ्या पाणबुड्यांबद्दल संदेशवहनाचा शब्द होता. या प्रकारातील पाणबुड्या आण्विक इंधनावर चालविल्या जातात. या प्रकारातील पाणबुड्या इंधन भरल्यानंतर १०० दिवसांपर्यंत पाण्याखाली राहू शकतात. या पाणबुड्या रशियन प्रोजेक्ट ९७१ श्चुका(Shchuka) अंतर्गत बांधल्या गेल्या होत्या. याची सुरुवात इ.स. १९८६ मध्ये करण्यात आली. या वर्गातील १५ पाणबुड्या बांधल्या गेल्या, त्यातील १० कार्यरत आहेत.