रामकट्टी महादेव मंदिर, बोरामणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रामकटटी महादेव मंदीर-बोरामणी या पानावरून पुनर्निर्देशित)

[१]

                             रामकट्टी  महादेव मंदिर- बोरामणी
या गोलाकार दगडावरतीच राम बसले होते.
समोरून मंदिराचा नजरा
या गोलाकार दगडावरतीच राम बसले होते.
हे मंदिराचे सुबक प्रवेशद्वार आहे.
खूप सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे.
              भारत हा खेड्यांचा देश आहे असे म्हंटले जाते आणि याच खेड्या-खेड्यात असतात ती वेगवेगळी देवी-देवतांची मंदिरे.भारताला जसा खेड्यांचा इतिहास आहे तसाच वेगवेगळ्या मंदिरांचा देखील एक आध्यात्मिक स्वरूपाचा असा दांडगा इतिहास आहे. अशाच एका मंदिराचा इतिहास म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी या गावच्या ‘रामकटटी महादेव मंदीर’ याचा.
              या नावावरूनच आपल्याला थोडीशी कल्पना येऊ शकते. अर्थात हे नाव कन्नड बोलीतील आहे. याचा अर्थ असा की, जेव्हा राम सितामातेच्या शोधासाठी फिरत होते त्या वेळी त्यांनी या जागेतील एका मोठ्या गोलाकार दगडावर काही काळ विश्राम केला होता. तसेच येथे त्यांनी शंभू महादेवाच्या लिंगाची प्रतिष्ठापना केली होती आणि तेव्हापासून या जागेस पवित्र मानून लोक या जागेची पूजा-अर्चा करू लागले. कालांतराने येथे छोटेसे मंदिर बांधण्यात आले. त्यामुळेच याचे नाव ‘रामकटटी महादेव मंदीर’ असे आहे असे येथील लोक सांगतात.
              खरच, भारतीय संस्कृतीच निराळी .आपण भारतात कोठेही असो येथील मंदिरांपासून आपण ७ कि.मी. पेक्षा जास्त लांब नाही. हे खरेच आहे आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘रामकटटी महादेव मंदीर’ होय. गेल्या ५-७ वर्षात या मंदिराचा बराच विकास करण्यात आला आहे. आधी या मंदिरास कळस नव्हता आता लोकवर्गणीच्या माध्यमातून याला कळस बसवण्यात आला आहे. तसेच या मंदिराच्या समोर एक छोटासा सभामंडप देखील बांधण्यात आला आहे.छोटे-मोठे कार्यक्रम या सभामंडपाच्या माध्यमातून पार पडले जातात. मंदिरात प्रवेश करताच याचे मोहक व कालाकूसरपूर्ण लाकडी द्वार आपले सहर्ष स्वागत करते. अत्यंत बारीक असे नक्षीकाम यावर साकारण्यात आले आहे. आत प्रवेश केल्यानंतर आपल्या प्रथम दर्शनी नजरी पडतो तो येथील ‘नंदी’.या मंदिराच्या आतमध्ये एक छोटेसे मंदिर/गाभारा आहे. या गाभाऱ्यातच शंभू महादेवाची मनमोहक पिंड आहे. या पिंडीवरती महादेवाचा मुखवटा व त्यांच्या भोवती नाग असा नयनरम्य देखावा येथे दररोज पुष्पहारांनी व वेगवेगळ्या फुलांनी सजवलेला असतो. पहाटे ४ वाजेपासून याची दारे भाविकांसाठी खुली असतात. या गाभाऱ्याचे संपूर्ण बांधकाम हे दगडी आहे गाभाऱ्याच्या बाहेर भजन, कीर्तन प्रवचन इ. कार्यक्रम करण्यासाठी मोठी जागा आहे. जेष्ठ नागरिक येथे येऊन देवाच्या नामस्मरणात लीन होतात. 
              
               या मंदिराचे महत्त्वपूर्ण आकर्षण म्हणजे याच्या शिखरावरती करण्यात आलेले नक्षीकाम. या नक्षीकामावारती दाक्षिणात्य कालाशैलीचा प्रभाव आढळतो.या शिखरावरती हिंदू देव-देवतांच्या मूर्ती सुबकपणे कोरण्यात आल्या आहेत. विविध घटनांचे प्रसंग या वरती दाखवण्यात आले आहेत. तब्बल १५१ फुटाचे हे शिखर या मंदिराची शोभा वाढवते. या शिखराच्या उंचीच्या वरती कोणीही बांधकाम करत नाही, जर कोणी केले तर त्या घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यु होतो असा समज येथील लोकांचा आहे. अशा प्रकारे १०० × १०० फुटाच्या जागेत हे मंदिर दिमाखात उभे आहे.
  1. ^ भारतीय मंदिरे - वी. म. खराटे