ॲन्ड्रॉइड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ॲन्ड्रॉइड
Android robot.svg Android logo.png
Android 4.1 on the Galaxy Nexus.jpeg
ॲन्ड्रॉइड ४.१ "जेली बीन"
मूळ लेखक गूगल, ओपन हॅण्डसेट अलायन्स
प्रारंभिक आवृत्ती २१ ऑक्टोबर २००८
सद्य आवृत्ती ४.१.१ (जेली बीन) (१० जुलै २०१२)
प्लॅटफॉर्म ए.आर्.एम्, एम्.आय्.पी.एस्, पॉवर आर्किटेक्चर, x८६
सॉफ्टवेअरचा प्रकार मोबाईल संचालन प्रणाली
परवाना अपाचे २.० अथवा जीपीएल (ग्नू जनरल पब्लिक लायसेन्स)
संकेतस्थळ ॲन्ड्रॉइड.कॉम

ॲन्ड्रॉइड (इंग्लिश: Android ;) ही मोबाईल फोनसाठी गूगल कंपनीने विकसित केलेली एक कार्यप्रणाली आहे. ही लिनक्सवर चालणारी मुक्त स्रोत संचालन प्रणाली आहे. ॲन्ड्रॉइडमध्ये जावा प्रोग्रॅमिंग भाषेसाठी विकासकांना स्वातंत्र्य मिळाले आहे. २१ ऑक्टोबर २००८ ला ॲन्ड्रॉइडची प्रारंभिक आवृत्ती प्रदर्शित करण्यात आली. सध्या १० जुलै २०१२ रोजी ॲन्ड्रॉइड ४.१.१ (जेली बीन) ही आवृत्ती प्रदर्शित करण्यात आली आहे. ॲन्ड्रॉइड आता मोबाईल पाठोपाठ टॅबलेट पी.सी.साठीही लोकप्रिय होत आहे. वापरकर्त्यांच्या दृष्टीने ऍपलच्या आयफोन खालोखाल दुसर्‍या क्रमांकावर असलेली व झपाट्याने लोकप्रिय होत असलेली ॲन्ड्रॉइड प्रणाली लिनक्स वापरून बनवली गेली आहे. नोकिया, ऍपल, ब्लॅकबेरी ह्या मोठ्या मोबाईल उत्पादक कंपन्या वगळता जगभरातील जवळजवळ सर्व मोठ्या मोबाईल फोन उत्पादकांनी (सॅमसंग, एलजी, सोनी एरिक्सन, मोटोरोला, एचटीसी, डेल, इत्यादी) ॲन्ड्रॉइडवर चालणारे स्मार्टफोन व टॅबलेट पी.सी. तयार केले आहेत.

२०१० च्या शेवटी ॲन्ड्रॉइड कार्यप्रणाली जगातील सर्वोत्तम विकला जाणारा स्मार्टफोन प्लॅटफॉर्म बनला आणि त्याने नोकियाच्या १० वर्षे सर्वोत्कृष्ट ठरलेल्या सिंबियन कार्यप्रणालीला हादरा दिला. कॅनालायीसच्या रिसर्च संस्थेच्या अहवालानुसार २०१० च्या शेवटी जगभरातून ॲन्ड्रॉइडचे ३३% स्मार्टफोन विकले गेले तर नोकियाच्या सिंबियनचे ३१% स्मार्टफोन विकले गेले.[१][२]

ॲन्ड्रॉइड मुक्त स्रोत असल्यामुळे ॲन्ड्रॉइडचा विकास करण्यासाठी जगभरात खूप मोठ्या संख्येत विकासकांचा समुदाय आहे. ॲन्ड्रॉइड फोनांसाठी आतापर्यंत २,००,००० पेक्षा जास्त उपयोजने उपलब्ध आहेत. त्यातील बहुसंख्य उपयोजने मोफत आहेत.

हेही पाहा [संपादन]

संदर्भ [संपादन]

  1. Google topples Symbian from smartphones top spot.
  2. Google's Android becomes the world's leading smart phone platform (Canalys research release: r2011013).

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत