आकाश (टॅबलेट)
आकाश हा ॲन्ड्रॉइड प्रणालीवर चालणारा एक टॅबलेट संगणक आहे. डेटाविंड ह्या माँत्रियाल-स्थित कंपनीने ह्याचे डिझाईन तयार केले असून त्याचे उप्तादन भारतात केले जाईल. ह्या टॅबलेटचा वापर व्हिडियो पाहण्यासाठी, संगीत ऐकण्यासाठी, पुस्तके व मासिके वाचण्यासाठी तसेच इंटरनेट ब्राउझिंगसाठी करता येईल. अंदाजे ६० अमेरिकन डॉलर किंमत असलेला व यूबीस्लेट ७ ह्या नावाने विकला जाणारा आकाश हा सर्व आधुनिक सुविधा असणारा जगातील सर्वांत स्वस्त टॅबलेट असेल.
ह्या टॅबलेटचा उपयोग भारतभरातील २५,०००कॉलेजे व ४०० विद्यापीठे इ-शिक्षणासाठी करतील असा अंदाज केला गेला आहे. भारत सरकारने अंदाजे १ लाख आकाश टॅबलेट उपकरणे खरेदी केल्याचे वृत्त आहे.
अनुक्रमणिका |
हार्डवेअर [संपादन]
- ७ इंच टचस्क्रिन
- दणकट बांधणी
- वायरलेस इंटरनेट
- हेडफोन जॅक
- २ युएसबी पोर्टस
- एआरएम आर्किटेक्चर प्रोसेसर
- २५६ एमबी मेमरी
सॉफ्टवेअर [संपादन]
- ॲन्ड्रॉइड २.२
- आयआयटीने विकसित केलेली शैक्षणिक सॉफ्टवेअर
शब्देतिहास [संपादन]
ह्या टॅबलेट ला आकश हे नाव देन्या पुर्वी साक्शात हे नाव दिले गेले होते.आकश हे नाव सन्स्क्रुत शब्द ' आकाशा ' ह्या वरुन घेतले गेले असुन ह्या शब्दाचे पुष्कळ अर्थ आहेत जसे की नभ,गगन.
विनिर्देश [संपादन]
| विनिर्देश | आकाश | यूबीस्लेट 7+ |
|---|---|---|
| किंमत | ||
| मध्यवर्ती प्रक्रियन विभाग गती | ARM11, 366 MHz | ARM कोर्टेक्स-A8, 700 MHz |
| रॅम | २५६ एमबी | २५६ एमबी[१] |
| बाट्री | 2100 mAh | 3200 mAh |
| ओपेरेटींग सिस्टीम | ॲन्ड्रॉइड 2.2 फ्रोयो | ॲन्ड्रॉइड 2.3 जिंजर्ब्रेड |
| नेटवर्क | Wi-Fi | Wi-Fi, GPRS फोन नेटवर्क |
| निर्माणाचे ठिकाण | भारत | भारत |
संदर्भ व नोंदी [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- डेटाविंड कंपनीचे संकेतस्थळ. (इंग्लिश मजकूर)
- आकाश टॅबलेट संकेतस्थळ. (इंग्लिश मजकूर)
- बुकिंग संकेतस्थळ. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |