हळद्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठीत हळद्या, पिलक अशी नावे असलेला हा पक्षी संपूर्ण भारत देशभर आढळतो. याचे इंग्रजी नाव गोल्डन ओरिओल (Golden Oriole) तर शास्त्रीय नाव Oriolus oriolus असे आहे.

नर हळद्या मुख्यत्वे जर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या पंखांचा रंग काळा असतो तसेच याच्या डोळ्याजवळ काळ्या रंगाची पट्टी असते. मादी नरासारखीच पण किंचीत फिक्या पिवळ्या-हिरव्या रंगाची असते. झाडांवर एकट्याने किंवा जोडीने आढळतो. झाडांच्या फांद्यांवर असला तरी हळद्या नजरेस पडणे जरा कठीणच, आवाजावरूनच तो ओळखू येतो.

Golden Oriole.ogg हळद्याचा आवाज ऐका

फुलांमधील मध, विविध फळे आणि लहान किडे हे याचे मुख्य खाद्य आहे. याचे घरटे लहान, कपच्या आकाराचे गवत, कोळ्याच्या जाळ्याने व्यवस्थीत विणलेले असते. विणीचा हंगाम एप्रील ते जुलै असा असून मादी एकावेळी २ ते ३ पांढर्‍या रंगाची अंडी देते. पिलांचे संगोपनाची सगळी कामे नर मादी दोघे मिळून करतात.

चित्रदालन[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.