Jump to content

हरक्यूल पायरो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हर्क्युल पॉयरो या पानावरून पुनर्निर्देशित)

एर्क्यूल प्वारो (फ्रेंच: Hercule Poirot; आय.पी.ए.-इंग्लिश: ɜrˈkjuːl pwɑrˈoʊ ; आय.पी.ए.-फ्रेंच: ɛʁkyl pwaʁo ;) हा अगाथा ख्रिस्ती हिने लिहिलेल्या इंग्लिश कादंबरी मालिकेतील मुख्य काल्पनिक नायक आहे.

हर्क्यूल पायरो हा एक काल्पनिक बेल्जियन गुप्तहेर आहे. ‘क्वीन ऑफ क्राईम’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अगाथा ख्रिस्ती या लेखिकेने पायरोची निर्मिती केली. पायरो अगाथा ख्रिस्ती यांनी लिहिलेल्या एकूण ३३ कादंबऱ्या व २ नाटकांमध्ये अवतरतो.

हर्क्यूल पायरो या पात्रावर इंग्लिश भाषेत अनेक रेडिओ तसेच टीव्ही मालिकांची झाल्या आहेत. याशिवाय पायरोच्या काही कथांवर स्वतंत्र चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

मराठीमध्ये हर्क्यूल पायरोच्या कथांचा अनुवाद मधुकर तोरडमल यांनी केला आहे. या अनुवादित कथा पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केल्या आहेत. मधुकर तोरडमल यांच्याखेरीज काही कथांचा अनुवाद रेखा देशपांडे यांनी केला आहे.

प्रभाव :

हर्क्यूल पायरोचे नाव हे त्याकाळी प्रसिद्ध काल्पनिक गुप्तहेरांवरून जन्माला आले होते. याखेरीज हर्क्यूल पायरोच्या कथांवर प्रसिद्ध काल्पनिक गुप्तहेर शेरलॉक होम्सचा जनक ऑर्थर कॉनन डॉयलचा प्रभाव जाणवतो. अगाथा ख्रिस्ती यांनी आत्मचरित्रामध्ये मी शेरलॉक होम्स पद्धतीने लिखाण करते, असे नमूद केले आहे.

लोकप्रियता :

द मिस्टिरियस अफेअर ॲट स्टाईल्स या पुस्तकात पायरो प्रथम अवतरला. द कर्टन हे त्याचे शेवटचे पुस्तक होते. या कथेमध्ये शेवटी पायरोचा मृत्यू होतो असा उल्लेख आहे. त्याकाळी त्याची एवढी लोकप्रियता होती की न्यू यॉर्क टाईम्सच्या मुखपृष्ठावर त्याला श्रद्धांजली वाहिली गेली होती. अशी श्रद्धांजली वाहिली गेलेला तो एकमेव काल्पनिक गुप्तहेर आहे.

सारांश :

हर्क्यूल पायरो हा एक निवृत्त बेल्जियन गुप्तहेर आहे. मात्र त्याच्या प्रसिद्धीमुळे निवृत्तीनंतरही अनेक लोक त्याच्याकडे आपल्या समस्या सोडविण्याकरता येतात. काही वेळा तो एखाद्या ठिकाणी उपस्थित असताना त्या ठिकाणी गुन्हा घडतो व त्याची उकल करण्यामध्ये त्याला नाईलाजाने सहभागी व्हावे लागते. पायरोखेरीज या कथांमध्ये त्याचा सहकारी कॅप्टन हेस्टिंग्ज, स्कॉटलंड यार्डचा इन्स्पेक्टर जॅप, रहस्यकथाकर एरिआडने ऑलिव्हर ही पात्रे अनेकवेळा आढळतात.

हर्क्यूल पायरो असलेली पुस्तके

[संपादन]
  1. द ॲडव्हेंचर्स ऑफ द ख्रिसमस पुडिंग
  2. अपॉइंटमेंट विथ डेथ
  3. आफ्टर द फ्यूनरल
  4. द ए बी सी मर्डर्स
  5. एलिफंट्स कॅन रिमेंबर
  6. एव्हिल अंडर द सन
  7. कॅट अमंग द पिजन्स
  8. कर्टन : पायरोज् लास्ट केस
  9. कार्ड्‌स ऑन द टेबल
  10. द क्लॉक्स
  11. टेकन ॲट द फ्लड
  12. डंब विटनेस
  13. डेड मॅन्स फॉली
  14. डेथ इन द क्लाऊड्स
  15. डेथ ऑन द नाईल
  16. थर्ड गर्ल
  17. थ्री-ॲक्ट ट्रॅजेडी
  18. पायरो इन्व्हेस्टिगेट्स
  19. पायरोज अर्ली केसेस
  20. पेरिल ॲट एन्ड हाऊस
  21. फाईव्ह लिटल पिग्ज
  22. द बिग फोर
  23. ब्लॅक कॉफी
  24. मर्डर इन मेसोपोटेमिया
  25. मर्डर इन द म्यूज
  26. द मर्डर ऑन द लिंक्स
  27. मर्डर ऑन द ओरिएन्ट एक्स्प्रेस
  28. द मर्डर ऑफ रॉजर अक्रॉयड
  29. मिसेस मॅक्‌जिंटी इज डेड
  30. द मिस्टरी ऑफ ब्लू ट्रेन
  31. द मिस्टीरियस अफेअर ॲट स्टाईल्स
  32. लॉर्ड एजवेअर डाईज
  33. द लेबर्स ऑफ हर्क्युलस
  34. वन, टू, बकल माय शू
  35. सॅड सायप्रस
  36. हर्क्यूल पायरोज् ख्रिसमस
  37. हॅलोविन पार्टी
  38. द हॉलो
  39. हिकरी डिकरी डॉक