सुलेमानी चहा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुलेमानी तथा लेबु चहा हा कोलकात्यामध्ये मिळणारा चहाचा प्रकार आहे.

ब्रिटिश लोकांनी प्रथम कोलकत्यात चहापिण्याची सवय आणली.हल्लीसुद्धा कोलकत्यात स्थानिक बिस्किटाबरोबर लेबु चहा घेऊनच सकाळची सुरुवात करतात.चहाचा मसाला हा प्रत्येक दुकानात खास असतो. उत्तर कोलकत्यात नेशनल इकॉनॉमिक रेस्टॉरंट जे १९२० सालापासून कार्यरत आहे ते ह्या चहासाठी प्रसिद्ध आहे.सुभाशिष बसाक जे आज त्या रेस्टॉरंटचे मालक आहेत ते सांगतात की जहारलाल बसाक ह्या त्यांच्या आजोबांनी दुकान सुरू केले.१९७० नंतर लेबु चहाची लोकप्रियता वाढली. प्रत्येक मोसमात हा चहा पितात आणि चहामुळे सर्दी, खोकला, आणि अपचनाचा त्रास होत नाही. चहाची चव ही लिंबू प्रकारावर अवलंबून असते. गंधराज किंवा पाटी लिंबू वापरले जाते.

साहित्य[संपादन]

२५० मिली पाणी. १/४ चमचा चहापाने १/४ चमचा चहा पावडर १ लिंबू चिमूटभर जिरे चिमूटभर खडेमीठ चिमूटभर काळीमिरी चिमूटभर ओवा १ चमचा साखर.

कृती[संपादन]

१.पाणी गरम करतात. २.३ मिनिटानंतर चहा पाने भिजवितात.चहापावडर सुद्धा टाकतात. पाच मिनिटे चहाचा रंग येईपर्यंत ठेवतात. ३.जिरे, काळीमिरी, ओवा आणि खडेमीठ टाकतात आणि ढवळतात. ४.एका लिंबाचे चार तुकडे करून त्यातील एका तुकड्याचा रस टाकतात. ५.रंग फिकट पिवळा झाला की साखर टाकतात. ६.चहा गाळतात आणि गरमागरम प्यायला देतात.

संदर्भ[संपादन]

मुंबई टाईम्स १३/१०/२०१९.