सीदोनी गाब्रीएल कोलेत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  संगीतगृहातील जीवनाचे प्रत्ययकारी चित्रण La Vagabonde (१९१०, इं. शी. द व्हॅगबाँड, इं.भा. १९३१), L’Envers du music-hall (१९१३) ह्यांसारख्या कादंबऱ्यांतून तिने केले आहे. स्मृतिचित्रणाची तिची प्रवृत्ती तिच्या अनेक कादंबऱ्यांतून आढळून येते. उदा., La Maison de Claudine (१९२३, इं. भा. माय मदर्स हाउस, १९५३), Sido (१९२९, इं. भा. १९५३). निसर्गाच्या जगात ती विलक्षण रंगून जाते. प्राणिसृष्टीचे तिचे सूक्ष्म ज्ञान Dialogues de betes (१९०४, इं. भा. क्रीचर्स ग्रेट अँड स्मॉल, १९५१) ह्यासारख्या लेखनामधून प्रत्ययास येते.

कोणत्याही साहित्यसंप्रदायापासून अलिप्त असलेल्या ह्या लेखिकेच्या कादंबऱ्यांतून तिची अत्यंत तरल आणि सूक्ष्म संवेदनशीलता तीव्रतेने जाणवते. विविध प्रकारच्या सुंदर प्रतिमा तिच्या कादंबऱ्यांतून वर्णनाच्या ओघात परिणामकारकपणे येऊन जातात. पौगडांवस्थेत संदिग्धपणे जाणवणाऱ्या भावना (Le Ble en herbe, १९२३, इं.भा. राइपनिंग, १९३२), विफल प्रीतीतून निर्माण झालेला तीव्र एकाकीपणा (Cheri, १९२०), मत्सरादी मनोविकारांची तीव्रता (La Chatte, १९३३) असे विविध जीवनानुभव तिच्या कादंबऱ्यांतून साकारले आहेत.  Gigi (१९४५, इं.भा. १९५२), Paris de ma fenetre (१९४४) ह्या तिच्या कादंबऱ्याही उल्लेखनीय आहेत. १९३६ मध्ये ‘रॉयल बेल्जियन अकादमी’ची आणि १९४४ मध्ये फ्रेंच ‘अकादमी गाँकूर’ची सदस्या होण्याचा बहुमान तिला प्राप्त झाला. १९५३ मध्ये फ्रेंच सरकारने ‘ग्रँड ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा किताब तिला दिला. पॅरिसमध्ये ती निधन पावली.