सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक
Appearance
सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक हे महात्मा जोतिराव फुले यांनी लिहिलेले मराठी पुस्तक आहे. फुल्यांनी आपल्या हयातीत लिहिलेले हे अखेरचे पुस्तक आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र यशवंत फुले यांनी इ.स. १८९१ साली हे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक फुल्यांच्या धर्मविषयक मतांचे सार मानले जाते.
आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये फुल्यांना पक्षाघाताची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांनी हे पुस्तक आपल्या डाव्या हाताने लिहून पूर्ण केले[१]. याची रचना संवादात्मक असून धर्म, पाप, पुण्य इत्यादी विषयांवर विविध व्यक्तींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी यात उत्तरे दिली आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अधिक वाचन
[संपादन]- विकिस्रोतावर सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक
- महात्मा फुले समग्र वाङ्मय (इ.स. १९९१) संपा. य. दि. फडके; महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ; पृ. ४२९-५२८
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ फुले, यशवंत; पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना; लिहिण्याचे मुख्य साधन जो उजवा हस्त तोच पक्षाघाताने निरोद्योगी झाल्यामुळे त्यास थोडे दुःख झाले. तथापि ईश्वरेच्छा म्हणून धैर्य न सोडता आपल्या डाव्या हस्ताने व अत्यंत विचाराने "सार्वजनिक सत्य धर्म" नावाचे पुस्तक तयार केले