सदस्य चर्चा:Ramchandra kadam

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Ramchandra kadam, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Ramchandra kadam, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,२०५ लेख आहे व १४१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात

  • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

येणार्‍या सर्व आव्हांनासाठी सज्ज[संपादन]

मानलेल्याना नात्याला ही पळवाट नेहमीच असते...त्यासाठीच ते पकडून ठेवायचे असते......नात असण्यात आणि मानण्यात जमीन आसमानाचा फरक असतो....असलेल नात जड़ झाल तरी माणूस झिडकारू शकत नाही नाकारू शकत नाही...... मनातून उतरलेल्या व्यक्तिशी कोणतही नात ठेऊ नका........ अस नात फक्त त्रास देत......पण मनाने जोडलेल्या नात्याला कधीही अंतर देवू नका......... कारण ते हृदयात बसलेले असते "

                      " एकवार आपण कर्ज मानल, की ते देण माणसाच कर्तव्य आहे..... नाहीतर आपल्याला ते मनात मिंदय करत...... मनात दास्य निर्माण करत ......शून्यातने मिळालेला शेवटचा रुपया ही जुगारात लावायला आवडेल...... कारण मी शुन्यातून विश्व निर्माण करू शकतो...... मग त्या रुपयातून का नाही पण हें सगळे चांगल्यासाठी .... तसं देवाने मला चांगलच "बनवल" आहे  मी देव मानतो... पण मी प्रयत्नवादी आहे. "
                
                      "ज्याला आपली मत मांडता येत नाही त्याला मत असून नसून सारखीच!!! आपली मत मांडण्यापेक्षा दुसर्याला पटणारे विचार बोलायचे.... मग विषय संपतो ...विश्वासघात फक्त विश्वासू व्यक्तीच करू शकते..... स्वत:च्या अस्तित्वावर बेतल की, या जगात कोणी कोणाच नसत ....एक माणूस म्हणून तुम्हाला सगळे गुन्हे माफ़.... पण माणूस असाल तर..."

                     " वादळ कधी परवानगीची वाट पाहत दारावर थांबत का?.... संसारात आपण कोणत्या व्यक्तिबरोबर संसार करतो आहे तिला महत्त्व द्यायला हव... संसाराला नाही...... श्रद्घा प्रेम शिकवते आणि अंधश्रद्धा फक्त बळी मागते...... "निसर्गाला रंग हवा असतो, फुलानाही गंध हवा असतो, माणूस हा एकटा राहणार कसा, कारण त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो !!!!!" ....पण फसवणाऱ्या  व्यक्तिसाठी माझ्या आयुष्यात स्थान नाही....... सोय पाहून केला जातो तो व्यवहार आणि गैरसोयीतही सोय पहिली जाते ते प्रेम .....हिशोब कळतो पण किम्मत कळत नाही"

                    " मला गाने  म्हणायला 101.209.51.65 आवडत..... पण मी गाने  म्हटलेल लोकांना आवडत नाही.... मला प्राणी आवडतात पण त्याना कैद करण आवडत नाही.....प्रत्येकाला स्वातंत्र्य दिल जाव.... कारण पकडून पकडून मैत्री करायाला आवडत नाही..... पण मैत्री केल्यावर पकडून ठेवायला आवडत "
                      " जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत लढाईचा शेवट होण शक्यच नाही....आयुष्यातली प्रत्येक लढाई जिंकली नसेन कदाचित.... पण लढली जरुर आहे  ...  "या जन्मावर.. या जगण्यावर शतदा प्रेम करावे...!!" आणि हेच जगणे आनंदी करणारी काही नाती माझ्या आयुष्यात महत्वाची आहेत. आयुष्यातील चांगुलपणावर विश्वास. खोटेपणा, वाईट वृत्ती, माणंस यांचा तिरस्कार..!! नशीबावर विश्वास नाही.....आयुष्य तुम्हाला ज्या मार्गाने नेत असेल त्या मार्गाने जाऊ नका. तर तुम्हाला ज्या मार्गाने जायचे असेल त्या मार्गाने आयुष्याला न्या "

                     " मी कधीच कोणती गोष्ट अर्धवट सोडत नाही..... चांगल किंवा वाईट झाल तरी त्याच खर कारण शोधून काढतो..... मी माझा कोणताच निर्णय नियतिवर सोडत नाही........ मला आयुष्यात जगताना धेय्य, तत्वांशी तडजोड मान्यच नाही...... कारण पर्याय ठेवून जगणारा मी नव्हे."

ज्योतिष वास्तुशास्त्राला पुरक[संपादन]

 ज्योतिष वास्तुशास्त्राला पुरक

ज्योतिष या शब्दाचे विश्लेषण केले असता, त्यात ज्योती हा शब्द मुख्‍य आहे. ज्योत म्हणजे अर्थातच दिव्याची प्रकाशित वात. जिथे वात, तिथे प्रकाश म्हणजेच उर्जा आहेच. म्हणजे ज्योतिष हे प्रकाशाचे अर्थातच उर्जेचे शास्त्र आहे.

विश्वात सूर्य हा प्रकाशाचा म्हणजेच उर्जेचा फार मोठा स्त्रोत आहे, त्याच्या शक्तीमुळे सुर्यमाला कार्यरत आहे. सूर्यामुळेच पृथ्वीला प्रकाश मिळतो. ज्योतिषशास्त्रात आपण सूर्याची उर्जा गती व प्रकाशमान पृथ्वी याचा होणारा परिणाम व वेळेची गती याचा अभ्यास करतो. म्हणजेच ज्योतिषशास्त्रात आपण सूर्य व सूर्यमालेतील इतर ग्रह चंद्र, मंगळ, बुध, शुक्र, शनी यांच्याबरोबर काळे गृह म्हणून ओळखले जात असलेले राहू व केतू, त्यांची गती, प्रकाश, उर्जा आणि त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम याचा अभ्यास करतो.

जगातील प्रत्येक गोष्टींपासून मिळणारी केंद्रीय स्पंदने, ग्रह वगैरेंच्या नैसर्गिक चक्रानुसार कालचक्राचे ज्ञान तसेच त्याचा पृथ्वीवरील प्राणीमात्रांवर होणारा परिणाम यांना अभ्यासणे हाच ज्योतिषाचा मुख्य विषय आहे.

वैदिक वाङमयात ज्योतिषशास्त्राला डोळ्यांचे स्थान दिले आहे. शरीरात डोळ्यांचे जे महत्त्व आहे तेच वेदांत ज्योतिषाचे आहे.

स्थापत्यवेदात ज्योतिषाचे महत्व :- या ब्रह्मांडात एकही गोष्ट अशी नाही की तिच्यावर नवग्रहाचा प्रभाव पडला नाही. पृथ्वीवरच्या सर्व सजीव-निर्जीव, चेतन- अचेतन, व्यक्त -अव्यक्त पदार्थांमध्ये काम करण्याची जी प्रवृत्ती आहे ती या नवग्रहाच्या व काळाच्या प्रभावाखालीच आहे. प्रत्येक घरावर कोणत्या ना कोणत्या रूपाने नवग्रहांचा किंवा एका विशिष्ट ग्रहाचा प्रभाव असतो.

हा प्रश्न नेहमी विचारला जातो, की वास्तुशास्त्र ही ग्रह-व्यवस्थापन तसेच घरबांधणीची कला किंवा विज्ञान आहे आणि ज्योतिषशास्त्र भविष्य सांगणारे म्हणजेच वर्तवणारे शास्त्र आहे. मग या दोन्ही शास्त्रांचा काय संबंध? म्हणून येथे हे सांगणे आवश्यक आहे, की पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश याबरोबरच मुख्य म्हणजे पृथ्वीची चुंबकीय उर्जा, क्षेत्र, सूर्य व त्याची किरणे त्याची उर्जा हे वास्तुशास्त्रातील आधारभूत घटक आहेत. याचाच अर्थ ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र ह्या दोन्हीचा मुख्य आधार सूर्य व पृथ्वी आहे. म्हणूनच या दोहोत परस्पर संबंध तर आहेच, पण ते एकमेकांना पुरकही आहेत. त्यामुळेच वास्तुशास्त्राचा अभ्यास करताना ज्योतिषशास्त्राचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.

वर सांगितल्याप्रमाणे स्थापत्यवेद व ज्योतिषशास्त्र हे एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे प्रत्येक वास्तुशास्त्रज्ञाला (वास्तुविशारदाला) ज्योतिषशास्त्राचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे येणार्‍या जातकाला त्याने कोणत्या शहरात, कोणत्या दिशेला घर बांधायला हवे किंवा कुठले शहर वा जागा त्याच्यासाठी त्याच्या व्यापाराच्या वाढीसाठी उपयुक्त आहे, कुठल्या दिशेची जमीन त्याच्यासाठी चांगली आहे, ती केव्हा खरेदी करायला हवी, त्यावर घर केव्हा बांधावे, मुख्य दरवाजा कुठल्या दिशेला आणि केव्हा बसवावा याविषयीचे संपूर्ण मार्गदर्शन वास्तुविशारदाने त्याला केले पाहिजे. घरबांधणीनंतर रंगाची निवडही महत्त्वाची आहे. घराच्या आत व बाहेर कोणते रंग जातकाला उपयुक्त तसेच लाभदायक ठरतील. घर बांधल्यावर गृहप्रवेश केव्हा करावा या सर्व बाबी जातकाचे जन्मनत्रक्ष तसेच त्याची ग्रहदशा यानुसार ठरवायला हव्यात. येथे वास्तुविशारदाचा ज्योतिषाशी संबंध येतो.

ज्योतिष व वास्तुशास्त्राची सांगड[संपादन]

ज्योतिष व वास्तुशास्त्राची सांगड सध्या आधुनिक पध्दतीने घरे बांधली जातात. त्यासाठी एका चांगल्या शिकलेल्या, अनुभवी, कुशल इंजिनिअरची, वास्तू विशारदाची गरज आहे. त्यांच्या तांत्रिक सहकार्याशिवाय घर बांधणे श्रेयस्कर नाही.

ही घरे नक्कीच सुंदर व मजबूत असतात. पण निसर्गानुरूप नसतात. शहरात व महानगरात आपण याचे भयावह परिणाम पहात आहोत. त्यापासून वाचण्यासाठी घरे नैसर्गिक रितीने बांधण्यात यावीत. अर्थात वास्तुशास्त्राच्या नियमांच्या आणि सिध्दांतांच्या आधारे गृहबांधणी करावी. जमिनीची निवड, घराचा योग्य दिशेशी असणारा ताळमेळ, जमिन मालकाच्या जन्म नक्षत्रानुसार मुख्य दाराचे ठिकाण, सूर्यप्रकाश व हवेचे योग्य वातानुकूलन तसेच घर बांधल्यानंतर होणार्‍या परिणामांची माहिती असणे आवश्यक असते.

भारतीय पंचांग पंचांग या शब्दाचा अर्थ म्हणजे पाच अंग. ती म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, करण व योग. भारतीय पंचांग दोन गोष्टींवर आधारीत आहे. ती म्हणजे चंद्राची भ्रमण कक्षा पृथ्वीच्या संदर्भात. (अमुक राशी स्थिते वर्तमान श्री चंद्रे) कारण चंद्र पृथ्वीला प्रदक्षिणा घालतो. आणि सूर्याच्या संदर्भात पृथ्वीची गती. कारण पृथ्वी सूर्याभोवती फिरते. (अमुक राशी स्थिते वर्तमाने श्री सूर्ये)

पक्ष : एका महिन्यात दोन पक्ष असतात. एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्णपक्ष. दोन्ही पक्षात पौर्णिमा व आमावसेशिवाय इतर तिथींची नावे सारखीच असतात.

शुक्ल पक्ष : आमावस्येनंतरची प्रतिपदा ते पौर्णिमा या काळात येणार्‍या तिथीला शुक्ल पक्षीय तिथी म्हणतात.

कृष्ण पक्ष : पौर्णिमेपासूनची प्रतिपदा ते आमावस्येपर्यतच्या तिथीला कृष्ण पक्षीय तिथी म्हणतात.

तिथी : ज्यातिषशास्त्रात चंद्राच्या प्रत्येक कलेला एक तिथी मानतात. तिथीची गणना शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होते.

तिथीची नावे : प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चर्तुदशी, चर्तुदशी नंतर शुक्ल पक्षाच्या पंधराव्या तिथीला 'पौर्णिमा' तर कृष्ण पक्षाच्या तिसर्‍या तिथीला आमावस्या म्हटले जाते.

तिथ अंकात लिहिली जाते. पौर्णिमेपर्यंत हा क्रम १ ते १५ अशा क्रमाने चालतो. पण त्यानंतर पुन्हा १ पासून लिहिले जाते आणि ज्या दिवशी आमावस्या असते त्या तिथीला तीस हा अंक लिहिला जातो