सदस्य:Ranvirkar01

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झावळ्याचा रविवार
* यरीहो म्हणजे खजुरीचे नगर (अनुवाद 34:3). खजूर हे विजयाचे चिन्ह समझले जात असे.
येशू व त्याचे शिष्य विश्रांति घेण्यासाठी यरूशलेमे पासून सुमारे दोन मैलावर असलेल्या बेथांनी या गावी जात असत.
येशूने त्यावेळी दोन शिष्यांना जवळच असलेल्या बेथफगे गावात गाढवाचे शिंगरु आणायला पाठविले.
येशू अनेकवेळा त्या गावात गेल्या असल्याने तिथे त्याच्या परिचयाचा कोणीतरी असण्याची शक्यता होती.
मग शिष्यांनी येशूच्या सांगण्यानुसार शिंगरु आणले. येशू त्याच्यावर बसला. वल्हांडणासाठी आलेले यात्रेकरू त्याच्यामागे चालू लागले.
येशूचे स्वागत लोकांनी राजासारखे केले. सायंकाळ झाल्यावर तो बेथांनीला गेला.


* येशू शिंगरावर बसून का आला?
त्याचे कारण म्हणजे लोकांना मसिहाची प्रतीक्षा होती.
त्यांनी नम्र मसिहाला पहावे असे येशूला वाटले. त्याने मानव जातीच्या उद्धाराचे आपले कार्य विंनम्रतेने केले, हिंसाचाराने नव्हे.
'पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो लीन आहे.' (जखर्‍या 9:9) ही भविष्यवाणी खरी व्हावयाची होती.
त्या शिंगरावर कोणीही पूर्वी बसलेले नव्हते.


* लोकांनी येशूच्या वाटेवर वस्त्रे व डहाळ्या पसरल्या. आपली वस्त्रे मलिन होतील याची लोकांनी पर्वा केली नाही,
अश्या वृत्तीतून जणू ते मसिहावरील त्यांचे प्रेम प्रगट करीत होते.
काही लोकांनी त्याच्या चमत्कारांबद्दल ऐकले असेल. म्हणून त्यांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली असतील.
परंतु बहुसंख्य लोकांना तो रोमी सत्ते विरुध्य बंडाचे नेतृत्व करील असे वाटले होते


लोक घोषणा देऊ लागले की, "प्रभूच्या नामाने येणारा राजा धन्यवादीत असो."
त्याच प्रमाणे विजयाची घोषणा म्हणून "होसन्ना" "होसन्ना" चा गजर करू लागले.
त्यांना असेच म्हणायचे होते की, "आम्हाला वाचव, रोमी सत्तेपासून वाचव."
स्तोत्र 118:25 वर ही घोषणा आधारित आहे. त्यात म्हटले आहे की, "हे परमेश्वरा, तुला विनवितो की, आमचा उद्धार कर,"
रोमी लोकांच्या दास्यातून आपली येशूने मुक्तता करावी म्हणून लोकांच्या घोषणा सुरू होत्या.
लोकांना राजकीय स्वातंत्र्य हवे होते.


यावेळी येशूचा हेतु केवळ यहुद्यांचे नव्हे तर संपूर्ण मानवजातीचे तारण करावे हा होता.
पापाच्या दास्यातून त्यांची सुटका करण्यासाठी तो आला होता.
रोमी लोकांच्या सत्ते पासून मुक्ति देण्यासाठी तो आला नव्हता
म्हणून त्याचाकडे चुकीची मागणी करता कामा नये. आमच्या साठी त्याची इच्छा काय आहे, हे जाणणे महत्वाचे आहे.


येशू ज्या ज्या वेळी आला त्या त्या वेळी निरनिराळ्या प्रकारे आला.
* या जगात येशू बालक बनून आला.
यरूशलेम मध्ये तो शिंगरावर बसून आला.
पुनरुत्थांनाच्या दिवशी सायंकाळी जेथे शिष्य होते, तेथील दारे याहूद्यांच्या भीती मुळे बंद असता येशू तेथे आला.
व मध्ये उभा राहून त्यांना म्हणाला,"तुम्हांस शांति असो."


आज जेव्हा येशू लोकांच्या हृदयात येतो तेव्हा त्याचे स्वागत करण्यासाठी त्यांनी सिद्ध असले पाहिजे.
विश्वासाने त्याचा स्वीकार केला पाहिजे.


झावळ्याच्या रविवार बद्दल विचार करतांना येशूचे शिंगरावर बसून येने हे त्याच्या लिनतेचे प्रतीक आहे.
विजयी राजा त्या काळी घोड्यावर बसून येत असे.
तरीही लोकांना हा फरक कसे काय लक्ष्यात आले नाही? असा प्रश्न आपल्याला पडतो.
लोक मसीहा ची इतक्या आतुरतेने वाट पाहत होते आणि जुलमी रोमी पासून आपली केव्हा एकदाची सुटका होते असे त्यांना वाटत होते.
म्हणूनच त्यांनी येशूची स्वागत केले. परंतु येशूचा उद्देश त्यांच्या लक्षात आला नाही
त्यांचा उद्देश मात्र स्वार्थी होता.


पापांपासून सुटका हे तर त्यांच्या ध्यानीमणी ही नव्हते.
त्यांना जगातील राज्य, स्वातंत्र्य हवे होते. रोमी सत्तेपासून सुटका हवी होती.
आणि हाच मोठा फरक त्याच्या विचारसरणीत होता, त्यामुळे त्यांना निराश व्हावे लागले.


परमेश्वराच्या कृतीचा अर्थ जेव्हा समजाऊन घेत नाही तेव्हा आपली निराशाच होते.
येशू जसा नम्र झाला तसे आपण ही नम्र असावे हे आपण झावळ्याचा रविवार या घटनेतून शिकतो.