सदस्य:AGT

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठयांचा गाळीव इतिहास! मराठे! क्षत्रिय कुलवंत, चातुर्वणातील क्षत्रिय वर्ण, उच्चकुलीन, बलवान, अटकेपार झेंडा नेणारे राज्यकर्ते, बहुजन समाजाचे रक्षण करण्यास पात्र.. मराठा समाजाची यांसारखी अनेक वर्णने अनेक इतिहासकारांनी आजवर केली आहेत. बाबाजी विष्णुराव राणे यांनी ‘हो! आम्ही शहाण्णव कुळी मराठे’ या पुस्तकात हीच माहिती नव्याने देण्याचा प्रयत्न केलाय मराठे! क्षत्रिय कुलवंत, चातुर्वणातील क्षत्रिय वर्ण, उच्चकुलीन, बलवान, अटकेपार झेंडा नेणारे राज्यकर्ते, बहुजन समाजाचे रक्षण करण्यास पात्र.. मराठा समाजाची यांसारखी अनेक वर्णने अनेक इतिहासकारांनी आजवर केली आहेत. बाबाजी विष्णुराव राणे यांनी ‘हो! आम्ही शहाण्णव कुळी मराठे’ या पुस्तकात हीच माहिती नव्याने देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र ही माहिती कुठेतरी विस्कळीत, अपूर्ण आणि आत्मकेंद्री वाटतेय. राणे यांनी विविध ऐतिहासिक संदर्भ, ग्रंथ, पुस्तके यांचा अभ्यास करून, मात्र ठरावीक काही भाग घेऊनच मराठयांचा हा इतिहास लिहिला असल्यासारखे वाटते. पुस्तकाच्या सुरुवातीला मराठा व महाराष्ट्र या शब्दांची व्युत्पत्ती देण्यात आली आहे. त्यात ज्यांचे राष्ट्र मोठे ते महाराष्ट्र, असे लेखक म्हणतो. ‘‘महारठ्ठा, मरहट्टा, महारथ, महारथी म्हणजेच मराठा. महाराष्ट्र म्हणजे, महारथींचा ऊर्फ मराठा क्षत्रियांचा देश होय. मरहट्टे ऊर्फ मराठे म्हणजे मागे न हटणारे महान योद्धे,’’ असे वर्णन लेखकाने विविध ग्रंथांच्या आधारे केले. सम्राट अशोकाच्या वीरगार येथील डोंगरात कोरलेल्या आदेशात ‘महाराष्ट्र’ हा शब्द योजिला आहे, अशी तोकडी माहिती लेखक देतो. मात्र त्यात नेमके काय होते, हे लेखक सांगत नाही. अशोकाच्या काळात हा प्रदेश ‘राष्ट्रीक’ आणि नंतर महा राष्ट्र म्हणून ओळखला गेला, अशी माहिती अनेक पुस्तकांत आहे. ती मात्र लेखकाने यात दिलेली नाही. या प्रदेशात महार आणि रट्टा या समाजाचे लोक राहिले, त्यावरून महारट्टा आणि त्याचेच पुढे महाराष्ट्र झाले, अशी माहिती अनेक इतिहासकार देतात. मात्र लेखकाने याचा कोणताही उल्लेख पुस्तकात केलेला नाही. मराठयांचा इतिहास सर्वानाच माहीत आहे. मात्र त्यांची कुळे, गोत्रे, प्रवर, कुलस्वामिनी यांची माहिती अनेकांना नसते, ती देण्यासाठीच हा पुस्तकप्रपंच केला, असे लेखक आपल्या मनोगतात सांगतो. त्यानुसार या पुस्तकात मराठयांची 96 कुळे, उपनावे, वंश, गोत्र, कुलाचार यांची माहिती दिली. मराठय़ांमधील विविध आडनावे, त्यांची गोत्रे, कुलदैवत, लग्नातील देवक या माहितीचे कोष्टक दिले आहे. मात्र गोत्र म्हणजे काय? मराठय़ांची ही 96 कुळे कधीपासून आली, याच कुलदेवता का, देवक काय असते, याबाबत काहीच माहिती नाही. मराठे हे क्षत्रिय आहेत, हे सांगत अन्य क्षत्रिय आणि मराठय़ांची सांगड घालण्याचा प्रयत्न लेखक करतो. क्षत्रिय हे श्रीरामाचे वंशज आहेत. श्रीरामाचा पुत्र लव याच्याच घराण्यात पुढे महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला, अशी माहिती लेखकाने दिलीय. त्यानुसार आर्याचे वंशज असलेले राजपूत आणि मराठे एकच आहेत, असे लेखक सांगतो. महाराणा प्रताप, मेवाडचा खुमान, महाराणा कुंभ, छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी राजे, राजर्षी शाहू महाराज या राजपूत-मराठा राजांचा इतिहास लेखकाने पुन्हा जागवला. त्याचप्रमाणे श्रीरामाची वंशावळ, भोसले घराण्याची वंशावळ, राजपुतांचे छत्तीस राजवंश, मेवाडमधील महान क्षत्रिय वीर यांचीही माहिती दिली आहे. मात्र मराठयांचा हा इतिहास काहीसा अपूर्ण असल्यासारखा वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी मराठयांची स्थिती काय होती? शिवकाळापूर्वी महाराष्ट्रात विखुरल्या गेलेल्या मराठा घराण्यांविषयी काहीच माहिती नाही. पेशवेकाळातील शिंदे, होळकर वा अन्य मराठा सरदारांविषयीच्या माहितीचा अभाव आढळतो. मराठे महान योद्धे होते, तर मराठा राज्य रसातळाला का गेले, याचे विवेचन केलेले नाही. कुठलीही चिकित्सा न करता फक्त मराठय़ांचे गुणगान करण्यात आले आहे. मराठा राजसत्तेचे कुठे चुकले, मराठा राज्य रसातळाला जाण्याची नेमकी कारणे याची माहिती देण्याचे लेखकाने टाळले आहे. केवळ अभिमान वाटावा असा आत्मकेंद्री इतिहास लेखकाने लिहिला आहे. तो खूपच विस्कळीत आहे. लेखकाने स्वत:च्या राणे घराण्याचा इतिहास, वंशावळ सांगितली आहे. विविध राजांची, राजसत्तेची, ऐतिहासिक घटनांची, स्थळांची छायाचित्रे दिली आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या दिवशी म्हणजेच 1 मे 1960 रोजी आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्र व मराठी जनतेबद्दल मांडलेले मनोगतही पुस्तकाच्या अखेरीस दिले आहे. याशिवाय ‘मनुस्मृती’चेही गोडवे गायले आहेत. मनूने आम्हाला महान ग्रंथ दिला, असे सांगत ‘मनुस्मृती’मध्ये जे दोष राहिले, ते आपल्या घटनेत राहू नयेत म्हणून डॉ. आंबेडकरांनी नव्या भारताची स्मृती (घटना) लिहिली, असे सांगून सारवासारव करण्याचाही प्रयत्न केलाय. हो! आम्ही शहाण्णव कुळी मराठे : बाबाजी विष्णुराव राणे आई भगवती प्रकाशन, मुंबई पाने : 131, किंमत : 240 रुपये