सदस्य:रामचंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जा.क्र.सआर/आस्था/लीग्नोकेन/ /२०१४/२ सहायक आयुक्त रत्नागिरी यांचे कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, ८५५ जी, पावन बंगला, एकता मार्ग, कार्यालय रत्नागिरी ४१५६१२ दिनांक - १६/०९/ २०१४

प्रति, मा. जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी.

         विषय : लीग्नोकेन इंजेक्शन समूह क्र. LC0102 बाबत 

महोदय, आपणांस सादर करण्यात येते कि, विषयांकित प्रकरणी दिनांक ०१.०४.२०२४ रोजी आपल्याकडून लीग्नोकेन इंजेक्शन समूह क्र. LC0102 मधील एका सील बंद व्हायल मध्ये कोळी सदृश किडा आढळल्याच्या प्राप्त तक्रारीचे अनुषंगे आपल्या औषध भांडारातून सदर औषधाचा नियमित नमुना फॉर्म १७ अंतर्गत काढण्यात आला होता व सदर कोळी सदृश किडा आढळून आलेली एक व्हायल पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेण्यात आली होती. सदर औषध नमुना शासकीय विश्लेषक, मुंबई यांनी त्यांचे अहवाल क्र.३५७७९ दि. २३.०५.१४ नुसार प्रमाणित घोषित केला आहे. सदर प्रकरणी उत्पादकाच्या स्तरावर आवश्यक ती योग्य कारवाई घेण्याबाबत मा. डायरेक्टर ड्रग्स कंट्रोल, चेन्नई यांना दिनांक २४.०६.२०१४ रोजी कळविण्यात आले आहे. तथापि त्यांचे कडून सदर प्रकरणी काय कारवाई झाली याबाबत माहिती प्राप्त झालेली नाही. सदर माहिती देणे बाबत त्यांना स्मरण पत्र पाठविण्यात आले आहे.

आपला,


( रा. ए. भिलारे ) सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, म. राज्य. रत्नागिरी