सदस्य:अपूर्व पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी अपूर्व पाटील, मराठी विकिपीडियात नवीन सदस्य आहे. मला विकि-मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि मदत हवी आहे!

(मार्गदर्शकांना सूचना: आपण मदत केल्यावर किंवा या सदस्याच्या ५०० संपादनांनतर हा संदेश कृपया काढून टाकावा)


शिक्षणाचे सुयोग्य माध्यम फक्त मातृभाषाच न मातु:परम देवत:! आपल्या संस्कृतीमधील एक प्रसिद्ध सुवचन! या भूतलावरच सर्वश्रेष्ठ दैवत म्हणजे आई होय! “आई” हा आपल्या मराठी भाषेतील सर्वांगसुंदर मंगलमय शब्द ! पण आज आपण तो स्वत:हून आपल्या जीवनातून हद्द्पार करत आहोत. आई बाबा , आजी-आजोबा या गोड शब्दाऐवजी आपणच आपल्या मुलांच्या तोंडी मारतोय “मम्मी-डॅडी” व ग्रँड मदर, ग्रँड –फादर. गुरुजी,बाई, ताई या शब्दांना घालवून सर, मॅडम याना डोक्यावर घेतलय. आता तर “”धन्यवाद-क्षमस्व”” या शब्दाऐवजी आपण सर्रास ”थेंक्यू-साॅरी प्रचारात आणलेत. असे अनेक मौल्यवान शब्द आपण आपल्या मायबोलीतून अस्तंगत करत आहोत. हे आपण थांबवायला हवय. आज तर मराठीतून अंक लिहिणे ,बोलणे,वापरणे आपण पार विसरून गेलोय . आपण बोलतो मातृभाषेतून , पण बोलताना प्रत्येक वाक्यात निम्म्यापेक्षा जास्त इंग्रजी शब्दांचा जाणून बुजून वापर करत असतो. पण आपल्याला याची अजिबात खंत वाटत नाही तर उलट अभिमान गर्व वाटतो. आपण आपल्या भावी पिढीला भारतीय संस्कृती पासून , आपल्या माती पासूनच तोडत आहोत . याचा भारतीय समाजातील विचारवंतानी, समाजधुरीणांनी , सर्वसामान्यांनी व राज्यकर्त्यांनीही गंभीरपणे सखोल विचार व कृती करणे हि काळाची गरज आहे. मानवी जीवनात देखील मातृभाषेचे स्थान मातेप्रमाणे अढळ आहे.आपल्या मुलांना मातृभाषेतून शिकवावे लागत नाही , तर ते सहजतेने आपणहून शिकतात. याच कारण मुल आईच्या पोटातूनच मातृभाषा शिकत. जस अभिमन्यू आईच्या पोटातून चक्र्व्युहाचा भेद करायला शिकला होता. मित्रहो विज्ञानाचेच सिद्ध केलय कि मानवी मेंदूची ९० टक्के वाढ हि वयाच्या तीन वर्षापर्यंत पूर्ण होते. मानवी मेंदू हा ईश्वर निर्मित जगातील सर्वात मोठासंगणक आहे, त्यामुळे मातृभाषेचे ज्ञान मानवाच्या मेंदुरुपी महासंगणकात कायम स्वरूपी जतन केल जात. म्हणून कुठलीही गोष्ट/ज्ञान आपण जसे मातृभाषेतून समजू शकतो , आकलन करू शकतो;वाचलेले,लिहिलेले लक्षात ठेवू शकतो, बोलू शकतो, प्रकट करू शकतो, ज्या आत्मविश्वासाने संभाषण करू शकतो , तसे आपण परकीय इंग्रजी भाषेतून करू शकत नाही, हेच शाश्वत सत्य आहे. हे सत्य विज्ञानानेही सिद्ध केलय.

   आपण जेंव्हा आपल्या कोवळ्या बालकानां इंग्रजी माध्यमातून शिकण्यास भाग पडतो, तेंव्हा आपण त्या निरागस,आनंदी,हसर्या, कोमल फुलावर अत्याचार करतो, त्यानां अकालीच कुस्कुरून टाकत आहोत. आपण त्यांच्या नैसर्गिक विकासाचा मार्गच बंद करून ठेवतोय. आपण  त्यांच्यावर जबरदस्ती , अन्याय करतोय. आपणच त्यांच्या प्रगतीच्या मार्गातील अडसर ठरतोय याची जाणीव पालकाना करून देणे अत्यंत गरजेचे आहे. इंग्रजी माध्यम हे मृगजळ आहे 

त्यामुळे ज्ञानाची तहान भागणारच नाही हे सत्य समाजमनाला पटवून शासकिय पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत.भाषेच्या मानसिक गुलामगिरीतून भारतीय समाजाने बाहेर पडलेच पाहिजे. प्रत्येक भारतीय बालकाला त्याच्या मातृभाषेतून शिक्षण मिळणे त्याचा जन्मसिद्ध नैसगिक अधिकार आहे व तो त्याला मिळालाच पाहिजे. एक भाषा म्हणून इंग्रजी अवश्य शिकूय, एवढेच नवे तर इंग्रजीवर प्रभुत्व मिळवू या. परंतु इंग्रजी माध्यमातून शिकणे सर्वस्वी अयोग्यच आहे. आपण मातृभाषेतून जसे बोलतो तसेच लिहिती(जसा उच्चार तसा आचार ). परंतु इंग्रजीची तऱ्हाच वेगळी, बोलणे व लिहिणे जमीन आसमानाचा फरक उदा. डॉटर हा शब्द घेऊ; बोलताना फक्त तीनच अक्षर परंतु लिहिताना मात्र (daughter) आठ अक्षर आहेत.त्यामुळे मुलांची सर्व शक्तीच पाठांतर करण्यावर खर्ची पडते; जेणे करून विद्यार्थ्याला विषयाच सखोल ज्ञानच होत नाही .म्हणून शिकायचं तर मातृभाषेतूनच;जो सर्वांगीण प्रगतीचा एकमेव मार्ग आहे.

 आपल्या देशावर मोगलांनी ४०० वर्षे राज्य केले.त्यावेळीही त्यांनी राज्य कारभाराची भाषा उर्दू व फारशी ठेवली. ब्रिटीशानी १५० वर्ष राज्य करताना संपूर्ण कारभार त्यांच्या इंग्रजी भाषेतून केला .मुठभर पोर्तुगीजांनी गोवा ताब्यात ठेवताना राज्यशटक स्वत:च्या पोर्तुगीज भाषेद्वारे हाकला होता. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलमी मोगल सत्तेविरुद्ध स्वतंत्र लढा पुकारतानाही व हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर ताबडतोब संपूर्ण राज्यकारभार मातृभाषेतूनच सुरु केला व बलाढ्य मुस्लीम राजवटीला सळो कि पळो करून सोडले.
         खर म्हणजे स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाचा संपूर्ण कारभार भारतीय भाषेतच सुरु करायला हवा होता. आपले स्वकीय राज्यकर्ते इतिहासापासून काहीही शिकायला तयार नाहीत. लक्षावधी भारतीयांनी आपल्या प्राणाचे बलिदान करून इंग्रजांना देशातून हाकलून दिले. राजकीय स्वातंत्र मिळाले पण आपल्या सरकारने मात्र इंग्रजी भाषेची गुलामगिरी आजतागायत स्वत:हून  स्वीकारली. आपले राज्यकर्ते इंग्रजी भाषेच्या मानसिक गुलामगिरीत राहण्यातच धन्यता मनात आहेत. देशाच्या सार्वभौम संसदेत खासदार, मंत्री  ह्यांना इंग्रजीतून भाषण करताना कसलीही लाज वाटत नाही, तर त्यांना त्याचा गर्व वाटतो ;धन्य ते लोकप्रतिनिधी!! भारतीय स्वातंत्र्याला  ६९ वर्षे उलटून गेल्यानंतरही या देशाचा कारभार इंग्रजी भाषेतून चालवला जातोय, हि अतयंत चीड आणणारी गोष्ट आहे . इतक्या वर्षानंतरही आपण आपल्या देशाची राष्ट्रभाषा ठरवू शकलो नाही, हे आपल्या राज्यकर्त्यांचे सर्वात मोठ अपयश आहे.आपल्या राज्यकर्त्यांनी  आपले सत्व , स्वाभिमान, देहाभिमान यांना कधीच तिलांजली दिलीय. स्वातंत्र्यासाठी स्वत:च्या आयुष्याचे होम पेटविणाऱ्या त्या हुतात्म्यांना वाटत असेल “हेची फळ काय मम तापला?”

वास्तविक स्वातंत्र्यप्राप्ती नंतर आपल्या सरकारने इंग्रजी भाषा झुगारून द्यावयास हवी होती पण झाले उलटेच. केंद्र सरकारने दक्षिण भारतातील काही अदूदृष्टी पुढार्यांच्या दबावाला बळी पडून इंग्रजी भाषेला सर्व स्तरांवर प्राधान्य दिले. काय गम्मत बघा, भाषावार प्रांतरचना झाली घटनेनुसार. प्रत्येक राज्याचा कारभार त्या राज्याच्या राजभाषेतून चालवणे अनिवार्य आहे. पण तिथेही इंग्रजीचीच कुरघोडी चालू आहे. सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमे पण राजभाषेला डावलून केवळ इंग्रजीच उदात्तीकरण करतायत. इंग्रज्यांच्याच भेदनीतीचा अवलंब करीत स्वकीय सरकारनेही मुठभर इंग्रजी शिकेल्या लोकांना हाताशी धरून गेली ६९ वर्षे सर्वसामान्य जनतेची नागणूक केली आहे. भारतीय जनता तशीच अज्ञानात राहावी, ती पुढे जाऊ नये, तिला तिच्या अधिकाराची जाणीव होऊ नये व भारतीय जनता आपल्या सर्वांगीण प्रगतीपासून वंचित राहावी म्हणूनच आपल्या सरकारनेही संपूर्ण राज्यकारभार इंग्रजी भाषेतुनच चालू ठेवला आहे. हे सर्वसामान्य भारतीय जनतेविरुद्धच महाभयंकर षड्यंत्र आहे. भारतवासीयांनी शतकानु शतके मानसिक व वैचारिक गुलामगिरीत राहावे म्हणून इंग्रजांनी आपल्यावर इंग्रजी भाषा लादली. यथावकाश शैक्षणिक क्षेत्रात इंग्रजी भाषेचा शिरकाव केला. हळू हळू ख्रिशन मिशनर्यांनी शहरात व खेडोपाडी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करुन त्यामार्फत इंग्रजी माध्यमाचा व ख्रिशन धर्माचा प्रसार सुरु केला. न्यायालयीन कामकाज पूर्णपणे इंग्रजीतून सुरु केल, जेणे करून सर्व सामान्य जनतेला काय न्याय दिला जातोय ते समजण्याचा प्रश्नच ठेवला नाही.संतापजनक गोष्ट म्हणजे आज हि न्यायालयांचा कारभार इंग्रजीतून चालवला जात आहे.मुख्यत: केंद्र सरकार,राज्य सरकारे आणि पराधीनतेच्या न्युनगंडातून बाहेर पडून या देशातील गोर गरीब व भोळ्या भाबड्या जनतेची फसवणूक थांबवावी.गेली दोनशे वर्षे भारतीय जनतेचे जे आर्थिक,सांस्कृतिक व मानसिक शोषण चालू आहे त्यास आता तरी पायबंद घातलाच पाहिजे.

इंग्रजी माध्यमाच खूळ स्वातंत्र्यानंतरच्या सत्ताधार्यांच्या तथाकातीत बुद्धिवंतांच्या सामाजधुरीनांच्या आणि मग सर्वसामान्य जनतेत इतक खोलवर भरलय /भरवल गेलय कि या देशाला इंग्रजीशिवाय पर्यायच नाही व इंग्रजी हि जागतिक भाषा आहे असा गोड गैरसमज अगदी पद्धतशीर पसरवला गेलाय. सत्य वस्तुस्थिती हि आहे कि जगातील ९०% देशात सर्व प्रकारचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून घेतात व देशाचा राज्यकारभारही त्यांच्या मातृभाषेतून चालवला जातो. आम्ही आमची सदसदविवेकबुद्धी तसेच विज्ञानहि गहाण टाकलय .इंग्रजी माध्यमाच्या मृगजळामागे लागुन आपण या देशाच्या भावी पिढ्या उद्ध्वस्थ करायचं ठरवलंय आम्ही आमच्या संस्कृतिशी, मातीशी बेईमानीच करत आहोत . सर्व प्रकारची प्रसारमाध्यमे सुद्धा इंग्रजीच स्तोम देशभर पसरविण्याच महान कार्य करत आहेत.वृत्तपत्रे,चित्रपट नायक, चर्चासत्रे , विविध वाहिन्यांवर दाखविल्या जाणार्या मालिका इत्यादिंवरून इंग्रजीभाषेच ओंगळवाण प्रदर्शन अनाठाई महत्व भोळ्याभाबड्या जनतेच्या सतत माथी मारलं जातंय.त्यामुळे शहरातील जवळ जवळ ९०% व खेड्यातील ६०% ते ७०% लोक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवत आहेत. हि वस्तुस्थिती अतिशय भयानक असली तरी ती आपण बदलली पाहिजे . हा महाभयंकर साथीचा रोग समूळ नष्ट करण्याची जबाबदारी सरकारची आहे व समाजाने त्यासाठी सहकार्य केल पाहिजे. भारतीय समाजाच्या इंग्रजीच्या मानसिक गुलामगिरीच बोलकं उदाहरण म्हणजे आपण आपली सही सुद्धा मातृभाषेतून न करता इंग्रजीतून करतो व तर भूषण मानतो. इंग्रजीतून सही करून आपण काय साधतो ? खरच आकलनाच्या बाहेर आहे. निदान आजपासून तरी आपण आपली सही मातृभाषेतून करण्यास सुरुवात करूया. या भारतवर्षात बालकांना शालेय, माध्यमिक, कला, वाणिज्य,विज्ञान, कृषी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, वकिली,वास्तूशास्त्र रचना, व्यवस्थापन आदी सर्व स्तरातील, सर्व प्रकारचे शिक्षण मातृभाषेतूनच मिळाले पाहिजे व तसे ते उपलब्ध करून देणे हे आपल्या सरकारचे आद्य कर्तव्य आहे व त्या साठी नियोजनपूर्वक लगेच पावले उचलली पाहिजेत.भारतमातेच्या सुरक्षिततेसाठी व सर्वकष प्रगतीसाठी भारतीय बालकांना मातृभाषेतूनच शिक्षण मिळायला पाहिजे. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण हे समृद्ध , सुधृढ व सुसंस्कृत सामाजिक जीवनाची पायाभरणी करते. आपल्या महाराष्ट्राची मायबोली व राज्यकारभाराची भाषा आहे ”मराठी” म्हणून महाष्ट्र सरकारने ताबडतोब सर्वप्रकारे शिक्षण मराठीतूनच उपलब्ध करून द्यावे हि नम्र प्रार्थना.

                         मोठ व्हायचं ना मग शिकायचं मराठीतून!!
                    ज्याच मातृभाषेवर प्रभुत्व , तो जग जिंकेल निश्चित!
            हि देशसेवा आहे व आपण सर्वांनी ती करायलाच हवी, हीच भारतमातेची इच्छा.

मराठीतून शिक्षण घेतलेले लोक डबक्यातच पोहत बसतील, त्यांना जगात सोडून द्या, पण भारतातही कुणी विचारणार नाही. वैद्यकीय शिक्षण मराठीतून द्यावे असे ज्यांना वाटते, त्यांनी मेडिकलच्या हजारो पुस्तकांपैकी एक अत्यंत प्राथमिक पुस्तक - 'ग्रे'ज अॅनाॅटाॅमी'चे - मराठी भाषांतर करून दाखवावे. ... (चर्चा) १२:१७, ३१ जुलै २०१८ (IST)


सर्वेक्षण(सर्व्हे)[संपादन]

  • भाषा-
  • सद्य निवास(केवळ शहर किंवा गावाचे नाव लिहा पत्ता फोन इमेल इत्यादी लिहिणे टाळावे) -
  • वय-
  • शिक्षण-
  • आपल्याला मराठी विकिपीडीयाची माहिती कोठून मिळाली.
  • वाचण्याकरिता आवडीचे विषय-
  • लिहिण्याकरिता आवडीचे विषय-
  • इंटरनेटचा वापर मुख्यत्वे
  • ऑपरेटींग सिस्टीम
  • ब्राऊजर
  • लिहिण्याकरिता मराठी फाँट
  • माझी शंका



  • माझे प्रश्न
  1. ...
  2. ...
  3. ...
  • आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती/ सहाय्य उपयूक्त वाटले काय ?
होय/नाही
  • अशी सुधारणा हवी-
  1. ...
  2. ...
  3. ...
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
अपूर्व पाटील (चर्चा) १२:०३, २३ जानेवारी २०१७ (IST)