श्याम पेठकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


श्याम पेठकर हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी जगदीश कदम यांची निर्मिती असलेल्या दोन लघुपटांचे लेखन केले आहे

चित्रपट निर्माते आशिष उबाळे यांच्या “गार्गी’ चित्रपटाचे संवादलेखन पेठकरांचे आहे. पेठकरांच्या कथेवर जगदीश कदम यांनी दोन लघुपट केले आहेत.

श्याम पेठकर हे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या ‘नाम’ फाउंडेशनचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.

नाव : श्याम ऊर्फ अनंत दत्तात्रय पेठकर

जन्म : 2 जुलै 1965, वणी, जि. यवतमाळ

शिक्षण  : बी. कॉम., बी.एम. सी. (जनसंवाद विद्या विभाग, नागपूर) प्रथम श्रेणी

पत्नी : सौ. भाग्यश्री पेठकर,

व्यवसाय : पत्रकारिता. त्रयवसायिक पत्रकारितेतच रस असल्याने सिव्हील डिप्लोमा झाल्यावरही या क्षेत्रात जाणीवपूर्वक प्रवेश. त्यामुळे त्या पदविकेचा उल्लेखही करत नाही. वर्डस् अँड व्ह्यूज, ही माध्यमे, भाषा, क्रिएटिव्ह रायटींग, भाषांतरे, पुस्तक प्रकाशने आणि ब्रँडींग करणारी कंपनी गेली दहा वर्षे चालवितो आहे.[ संदर्भ हवा ]

अनुभव : 1992 ते 2001- दै. लोकमत, नागपूर येथे उप-संपादक, त्या आधी 1985 पासून दै विदर्भ मतदार या दैनिकात ऊपसंपादक म्हणून काम. बुलडाण्याहून प्रकाशित होणाऱ्या मतदारच्या आवृत्तीचा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. 2001 ते 2003 : दै. तरुण भारत नागपूर येथे

मुख्य उपसंपादक. 2003 ते 2005 : दै. सकाळ, नागपूर येथे मुख्य- उपसंपादक.

2005 पासून : दै. तरुण भारत, नागपूर येथे मॅगझीन एडिटर म्हणून काम.

2013 मार्च : पासून दै. लोकशाही वार्ता दैनिकात सहायक संपादक म्हणून रुजू. शहर वार्ता विभागाची विशेष जबाबदारी.[ संदर्भ हवा ]

2014 पासून : संपूर्ण संपादकीय जबाबदारी. मार्च 2015 पासून संपादक म्हणून नियुक्ती. या काळात अडचणीत असलेले हे दैनिक बऱ्यापैकी मार्गावर आणण्यात महत्त्वाची भूमिका.

2016 पासून : तरुण भारत, नागपूर येथे संपादक म्हणून रुजू. 2020च्या डिसेंबर पासून तरुण भारतचा राजीनामा देऊन पूर्णवेळ व्यवसायिक लेखक म्हणून काम सुरू केले आहे.

विशेष - दै. लोकमतला तरुणांचे ‘युवा मंच’ हे संघटन उभारले. वृत्तपत्राच्या माध्यमातून असे तरुणांचे संघटन उभे करण्याचा हा पहिलाच यशस्वी प्रयत्न. विदर्भात 20,000 महाविद्यालयीन तरुणांचे संघटन उभे केले. [ संदर्भ हवा ]

- टिप्पारणी, हा वऱ्हाडी भाषेतील स्तंभ दै. लोकमतला सात वर्षे लिहिला. नाटके, कथा, कवितांचेही सातत्याने लेखन.

- ई टीव्ही मराठी वरील ‘टिकल ते पोलिटिकल’ या प्रहसनात्मक मालिकेसाठी लेखन.[ संदर्भ हवा ]

- रगतपिती हे नाटक 39व्या राज्य नाट्य स्पर्धेत महाराष्ट्रातून सर्वाधिक पारितोषिकांसह पहिले आले. हा अद्यापही एक विक्रम आहे. नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या बहुभाषक महोत्सवात सन्मानपूर्वक सादरीकरण. पुण्याच्या गणेश फेस्टीव्हलला निमंत्रणावरून सादरीकरण.[ संदर्भ हवा ]

पुरस्कार - दै. विदर्भ मतदार मध्ये लिहिलेल्या अग्रलेखास मा. गो. वैद्य पुरस्कार.

- रगतपिती, एक होता माणूस या नाटकांना महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत लेखनाचे पारितोषिक.

- दमन, या नाट्यसंग्रहास 2005चा अण्णासाहेब किर्लोस्कर, हा राज्य वाङ्मय पुरस्कार.

- दमन या नाट्य संग्रहास, महाराष्ट्र सारस्वत पुरस्कार.

- सावली या एकांकिकेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पु. ल. महाकरंडक एकांकिका स्पर्धेत विभागीय फेरीत पहिले बक्षीस. इतर एकांकिका स्पर्धांमध्येही स्पृहणीय यश.

- टिंगल टिंगल लिटल स्टार हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेच्या विभागीय फेरीत पहिले.

- ऋतुस्पर्श या ललितबंधाला 2007-08 या वर्षीचा भैरूरतन दमानी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार.

- गोष्ट छोटी डोंगराएवढी या चित्रपटाच्या संवाद लेखनासाठी प्रतिष्ठेचा ‘मटा सन्मान’ पुरस्कार.

- ‘तेरवं’ हे आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या समस्यांवर लिहिले. विशेष म्हणजे त्यांना नाट्य प्रशिक्षण देऊन ते बसविले. त्याचे प्रयोग मुंबई विद्यापीठापासून महाराष्ट्रात महत्त्वाच्या शहरात झाले. त्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार मिळाला.[ संदर्भ हवा ]

प्रकाशित पुस्तके : - टिप्पारणी : लोकमत मधील वऱ्हाडी भाषेतील स्तंभातील निवडक लेखांचा संग्रह. दमन : रगतपिती आणि बंदी क्रमांक सत्तावन्न त्र्याण्णव या दोन संहितांचा संग्रह. ऋतुस्पर्श : दै. तरुण भारत येथे दर रविवारी लिहिलेल्या ऋतुंवरील ललितबंधात्मक अग्रलेखांचा संग्रह. तिसरी आवृत्ती प्रकाशित. गावझुला : गाडगेबाबा घरून निघून गेले. बारा वर्षे ते अज्ञातवासात होते. त्या नंतर डेबुजीचा गाडगेबाबा झाला. या एका तपात त्यांनी काय केले हे कुणालाच माहिती नाही पण या ललितबंधात्मक कादंबरीच्या रूपात अमूर्तशैलीत तिथे पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. यात गाडगेबाबांच्या आयुष्यातील घटना, प्रसंग घेण्यात आलेले नाहीत. त्यांचा कुठे स्पष्ट उल्लेखदेखील नाही. दुसरी आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर.

भावलीचे लगीन : ही कादंबरी गाजली. विवाह संस्थेवरील हे प्रसहन अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले. नुकताच ‘आडातलं’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. याला नाना पाटेकर यांची पाठराखण आहे. - वर्तमान पत्रकारिता, या विषयावर अनेक ठिकाणी व्याख्याने.

अप्रकाशित गाजलेली नाटके : वेडा, अलकनंदा, एक होता माणूस, श्रीकांत प्रुभुणेची प्रेमकथा, टिंगल टिंगल टंगल लिटल स्टार, सावली (एकांकिका), छकुली आणि सिंदबाद (बालनाट्य), डेबुजी डॉट कॉम (एकपात्री), पुरुष गाळणाऱ्या बायकांचा गाव, हुकूमशहा, तेरवं, दाभोळकरचे भूत. - दाभोळकरचे भूत हे नाटक मध्यंतरी महाराष्ट्रात खूप गाजले. - तेरवं हे शेतकऱ्यांच्या विधवांच्या संघर्षावर नाटक आहे. त्यात त्या विधवा स्त्रियांनीच काम केले आहे. अ‍ॅग्रो थिएटर या संकल्पनेवर गेली काही वर्षे काम करतो आहे. त्यातून या नाटकाचा जन्म झाला.[ संदर्भ हवा ]

लेखन केलेले चित्रपट गोष्ट छोटी डोंगराएवढी : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात चित्रपट. मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, निळू फुले. दिग्दर्शन : नागेश भोसले. (संवाद लेखनासाठी प्रतिष्ठेचा ‘मटा सन्मान’ पुरस्कार.) गार्गी एक विचार : एक वेगळ्या विषयाची संयत मांडणी करणारा चित्रपट. फेस्टीव्हल्समध्ये गाजला. आनंदाचे डोही : प्रदर्शनाच्या वाटेवर. दिलीप प्रभावळकरांची प्रमुख भूमिका. ग्रामीण अर्थव्यवस्था, ग्रामव्यवस्था, शेतकऱ्यांच्या समस्या हे विशेष रस असलेले अभ्यासाचे विषय आहेत. गाडगेबाबांच्या चळवळीचाही अभ्यास. त्या बाबतमीत सामाजिक पातळीवर कामही करत असतो. तशा अनेक संस्थाशी जुळलेलो आहे. मानाचि, म्हणजे मालिका, नाटक, चित्रपट या लेखकांच्या संघटनेचा सभासद. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनचा संस्थापक सदस्य. कथाकथनाचे अनेक कार्यक्र केले आहेत. गांधी विचार हे जीवनतत्त्व मानतो. निसर्ग हाच धर्म आहे आणि माणूसकीला नाकारणाऱ्या कुठल्याही बाजूच्या कट्टरतेबाबत तीव्र नापसंती आहे. अंधश्रद्धा निर्मुलनाच्या चळवळीतही कार्यरत.[ संदर्भ हवा ]

श्याम पेठकर यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • ऋतुस्पर्श (ललित लेख) : नागपूरच्या 'तरुण भारत'मध्ये अग्रलेखांच्या रूपात प्रसिद्ध झालेले निसर्गाच्या डोहाळ्यांचे कौतुक करणारे लेख.
  • गावझुला (ललित लेख)
  • दमन (नाटक)
  • दाभोळकरचे भूत (नाटक)
  • भावलीचं लगीन (कादंबरी)