शुद्ध व उपयोजित रसायनशास्त्राची आंतरराष्ट्रीय संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शुद्ध व उपयोजित रसायनशास्त्राची आंतरराष्ट्रीय संस्था (इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाय्ड केमिस्ट्री, लघुरूप आययूपीएसी; उच्चार : आययुपॅक) हा विविध देशांमधील रसायनशास्त्रज्ञांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय आसंजी संस्थांचा आंतरराष्ट्रीय संघ आहे. विज्ञानासाठीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांपैकी ही संस्था एक आहे. आययुपॅकचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय स्वित्झर्लंडमधील झुरिच इथे आहे. 'आययुपॅक सचिवालय' या नावाने ओळखले जाणारे तिचे प्रशासकीय कार्यालय अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना राज्यात रिसर्च ट्रँगल पार्क इथे आहे. त्याचा कारभार आययुपॅकचे कार्यकारी संचालक पाहतात.


बाह्य दुवे[संपादन]