शब्द साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन (स्थापना ९-८-२००९) या संस्थेच्या अंतर्गत पिंपरी-चिंचवडमध्ये एक शब्द साहित्य मंडळ आहे. या मंडळातर्फे महाराष्ट्रात ‘मराठी शब्द साहित्य संमेलन’ नावाची राज्यस्तरीय संमेलनेे भरवली जातात. या मंडळात कवी, लेखक, साहित्यिक, गझलकार, व्यंगचित्रकार, छायाचित्रकार आदींंचे सदस्यत्व आहे. ही सदस्यसंख्या २०१६ जानेवारीपर्यंत अडीच हजारावर गेली आहे.

या शब्द साहित्य मंडळाचे कार्यालय निगडीमधील सिटीप्राईड इमारतीतील तारांगण येथे आहे. संस्थेचे संमेलनाव्यतिरिक्त अन्य साहित्यिक उपक्रमहीे असतात. ते असे :

  • निळा घोडा नावाचा साहित्यिक कार्यक्रम (इ.स. २०१४)
  • ‘शब्द मराठी फेसबुक समूह’तर्फे प्रतिभावान कवींच्या कवितांचे संकलन (चालू उपक्रम).

मंडळाने भरविलेली यापूर्वीची शब्द साहित्य संमेलने[संपादन]

  • १ले संमेलन, सिरकुटणी (वर्धा जिल्हा : संमेलनाध्यक्ष - प्रा. अशोक थोरात
  • २रे संमेलन, पुणे : संमेलनाध्यक्ष - गझलनवाज भीमराव पांचाळे
  • ३रे संमेलन, नागपूर : संमेलनाध्यक्ष - चित्रपटनिर्माते राजदत्त
  • ४थे संमेलन, अलिबाग : संमेलनाध्यक्ष - कवी व निवेदक अरुण म्हात्रे
  • १ले मराठी विश्व शब्द साहित्य संमेलन, बँकॉक, इ.स. २०१४, संमेलनाध्यक्ष : कवी सौमित्र
  • २रे मराठी विश्व शब्द साहित्य संमेलन,(आगामी), बाली (इंडोनेशिया)

पहा : मराठी साहित्य संमेलने