शक्तिमान
शक्तिमान हे प्रससिद्ध "शक्तिमान" या दूरदर्शन मालिकेतील पात्र आहे. शक्तिमान ही दूरदर्शन मालिका प्रथम 13 सेप्टेंबर 1997 रोजी प्रसारित करण्यात आली. मुकेश खन्ना यांनी शक्तिमान चे पात्र बजावले.
शक्तिमान हे भारतीय चित्रवाहिनी वरचे पहिले "सुपरमॅन" वरुण प्रेरणा घेतलेले पात्र आहे.
शक्तिमान विविध शक्तींचा वापर करून वाईट गोष्टींविरुद्ध लढतो, व शेवटी विजय सत्याचाच होतो या तत्त्वावर जीवन जगतो.
शक्तिमान हा दिवसा व सर्व लोकात गुप्त प्रकारे "पंडित गंगाधर विद्याधर मायधर ओंकारनाथ शात्री" या नावाने पत्रकारच्या भूमिकेत जीवन व्यतीत करत असतो.
कथानक [संपादन]
पंचमहाभूतान (हवा , जमीन , अग्नि , वायु , अवकाश) पासून मिळालेल्या शक्तींपासून शक्तिमान ची निर्मिती होते. त्यास पृथ्वी वरील वाईट शक्तींनाचा नायनाट करण्याचे काम महा ऋषींनी सोपवलेले असते.
प्रसिद्धी [संपादन]
शक्तिमान जसे जसे प्रसिद्ध होत गेले, तसे तसे मालिकेत देशभक्तिपर तसेच स्वच्छतेवर संदेश देणारे छोट्या चित्रफिती टाकण्यात आल्या, व कार्यक्रमा शेवटी त्या दाखवल्या जात असत.
शक्तिमान ही "सुपरहीरो" मालिका दूरदर्शन वरील एकुलती एक मालिका आहे जीने 400 पेक्षा जास्त भाग पूर्ण केले, त्यानंतर "आर्यमान" , "जूनियर जी" इत्याती मालिका आल्या , पण त्यांना यशाचे शिखर गाठता आले नाही.
2001 मध्ये गुजरात भूकंपा मध्ये हानी झालेल्या भागांना शक्तिमान अवतारात मुकेश खन्ना यांनी भेट दिली व मदत केली.
प्रसिद्धी बरोबरच या कार्यक्रमास काही लोकांच्या रोषास पण सामोरे जावे लागले, शक्तिमान मालिकेत हवेत एक बोट उंच करून उडत असतो, व संकट समयी सामान्य नागरिकांची मदत करत असतो - ही गोस्ट मुलांच्या मनावर इतकी बसली - की लहान मुले या काल्पनिक पात्राला खरे समजून स्वतः पण एक बोट वर करून उडायचा प्रयत्न करू लागले , व शक्तिमान ल भेटायचे म्हणून स्वतहला मुद्दमून संकटात टाकू लागली , यातून बऱ्याच मुलांनी स्वतहला दुखापत करून घेतली.
बाह्य दुवे [संपादन]
- Shaktimaan Comics चित्रमालिका
- Shaktimaan International Catalogue of Superheroes
- Shaktimaan profile at BizHat.com
- Interview with Mukesh Khanna at Indiantelevision.com