व्हॅक्युम वापरून प्रसूती
Appearance
प्रसूतीला वेळ लागत असल्यास, प्रसूतीच्या कळा नीट येत नसल्यास किंवा बाळाला बाहेर ढकलतांना माता थकून गेल्यास, धातूच्या अथवा सिलीकोनच्या व्हॅक्युम कपाच्या मदतीने बाळाचे डोके घट्ट धरून त्याला बाहेर काढतात.
केव्हा वापरतात?
[संपादन]प्रसूती दरम्यान तिसऱ्या टप्प्यामध्ये माता काही कारणांमुळे जोर लावून बाळाला ढकलू शकत नसेल किंवा बाळाच्या डोक्याचा घेर व अस्थिकटी यांच्या आकारातील असमतोलाने बाळाचे डोके खाली सरकत नसेल तर बाळाला मेंदूमध्ये कायमस्वरूपी प्रकारची इजा संभावते. यातून मार्ग काढण्याकरिता व्हॅक्युम वापरून प्रसूती करत असतात.
वापरण्याची पद्धत
[संपादन]आधी बाळाच्या डोक्याचा स्तर जाणून घेतला जातो. डोक्याला धातूच्या अथवा सिलीकोनचा व्हॅक्युम कप व्यवस्थितपणे घट्ट बसेल हे पाहिले जाते.
- व्हॅक्युम कप निर्वात यंत्राला जोडला जातो. आतली हवा काढून घेतली की कप डोक्याची घट्ट पकड घेतो.
- प्रसूती कळा आल्यानंतर मातेस बाळाला बाहेर ढकलायला सांगितले जाते, व हाताने व्हॅक्युम कप खालील दिशेने खेचण्यात येतो.
- बाळाच्या डोक्याला इजा न करता योनिमार्गाला छेद दिला जातो.
- बाळाची प्रसूती केली जाते.
संभाव्य धोके
[संपादन]-
प्रसूतीसाठी वापरायचा धातूचा व्हॅक्युम कप वापरून प्रसूत झालेल्या बाळाचे डोके]]
- बाळाच्या कवटीवर आघात झाल्यास किंवा निर्वात दाब जास्त झाल्यास मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता असते. हे बाळाच्या बाबतीत धोकादायक ठरू शकते.