"खोती पद्धत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८: ओळ ८:


कोकणातील बहुतांशी खोत घराण्याची आडनावे ही सर किंवा प्रभू या उपसर्गाने सुरु होतात.उदा.[[सरदेशपांडे]], सरदेसाई, सरपोतदार, सरजोशी, प्रभुदेसाई इ.
कोकणातील बहुतांशी खोत घराण्याची आडनावे ही सर किंवा प्रभू या उपसर्गाने सुरु होतात.उदा.[[सरदेशपांडे]], सरदेसाई, सरपोतदार, सरजोशी, प्रभुदेसाई इ.
==हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

२३:४८, १९ जुलै २०१९ ची आवृत्ती

खोतांच्या प्रशासन पद्धतीला खोती असे म्हणत. खोत हा ब्रिटीश भारतातील गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे. तो गावातील शेतसारा गोळा करून सरकारला देत असे. खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो.

खोती पद्धत बहुतांशी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आढळून येत होती. खोती पद्धतीने शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण होत होते. कुळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा, अशी ही अन्यायकारक पद्धत होती. ही एक प्रकारची वेठबिगारीच होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खोती पद्धतीला नष्ट करण्यासाठी लढा दिला व ही पद्धत समाप्त केली. त्यांनी इ.स. १९०५ ते १९३१ या काळामध्ये पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड, खेड, तळा, रोहा इत्यादी गावांत अनेक सभा घेतल्या. त्यानंतर खोतांना हादरा देण्यासाठी कोकणातील १४ गावच्या शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ पर्यंत संप पुकारला होता.[१] शेतकरी नेते नारायण नागू पाटील हे या संपाचे नेतृत्व करत होते. शेतकऱ्यांच्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साथ दिली. त्यावेळी झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकऱ्यांच्यावतीने न्यायालयात उभे राहिले होते.[२]

खोतांचे अधिकार

एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत. खोत या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो. खोताचे हक्क हे वंशपरंपरेने चालत असत. खोताकडे घाटावरील देशमुख आणि देशपांडे यांप्रमाणे काही अधिकार होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट झाले. तरी काही प्रमाणात गावातील त्याचा मान किंवा वजन तसेच राहिले.

कोकणातील बहुतांशी खोत घराण्याची आडनावे ही सर किंवा प्रभू या उपसर्गाने सुरु होतात.उदा.सरदेशपांडे, सरदेसाई, सरपोतदार, सरजोशी, प्रभुदेसाई इ.

हे सुद्धा पहा

संदर्भ