"राजा ढाले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ २: ओळ २:


==कारकीर्द==
==कारकीर्द==
पँथरमध्ये सामील होण्यापूर्वी ढाले 'लिटल मॅगझिन' चळवळीत सक्रिय होते. त्यांच्या नेतृत्वात इतर कार्यकर्त्यांनी [[मराठावाडा विद्यापीठ]] नामांतराचा लढा लढला. त्यानंतर दलित पँथरने अनेक लहान-मोठी आंदोलने केली. ढाले शुद्ध बौद्ध-आंबेडकरी विचारांचा पुरस्कर्ता होते. [[भदन्त आनंद कौसल्यायन]] यांच्या संपर्कात आल्यानंतर तर बुद्ध विचाराचा ते प्रखर पुरस्कार करू लागले. त्यांनी 'दलित साहित्या'चा 'आंबेडकरवादी साहित्य' असा शब्द प्रयोग सुरू केला. ते नेता, मार्गदर्शक आणि [[आंबेडकरवादी चळवळ]]ीचा भाष्यकारही होते. तसेच ते चित्रकार आणि कवीही होते. त्याचे वाचन दांडगे होते. त्यांच्याकडे पुस्तकाचा मोठा संग्रह होता. पँथरनंतर दिशाहिन झालेल्या आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचे काम त्यांनी केले.<ref>https://m.maharashtratimes.com/editorial/article/on-panther-leader-raja-dhale/articleshow/70239103.cms</ref>
पँथरमध्ये सामील होण्यापूर्वी ढाले 'लिटल मॅगझिन' चळवळीत सक्रिय होते. त्यांच्या नेतृत्वात इतर कार्यकर्त्यांनी [[मराठवाडा विद्यापीठ]] नामांतराचा लढा लढला. त्यानंतर दलित पँथरने अनेक लहान-मोठी आंदोलने केली. ढाले शुद्ध बौद्ध-आंबेडकरी विचारांचा पुरस्कर्ता होते. [[भदंत आनंद कौसल्यायन]] यांच्या संपर्कात आल्यानंतर तर बुद्ध विचाराचा ते प्रखर पुरस्कार करू लागले. त्यांनी 'दलित साहित्या'चा 'आंबेडकरवादी साहित्य' असा शब्द प्रयोग सुरू केला. ते नेता, मार्गदर्शक आणि [[आंबेडकरवादी चळवळ]]ीचा भाष्यकारही होते. तसेच ते चित्रकार आणि कवीही होते. त्याचे वाचन दांडगे होते. त्यांच्याकडे पुस्तकाचा मोठा संग्रह होता. पँथरनंतर दिशाहिन झालेल्या आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचे काम त्यांनी केले.<ref>https://m.maharashtratimes.com/editorial/article/on-panther-leader-raja-dhale/articleshow/70239103.cms</ref> राजा ढालेंचा [[झेन]], [[महानुभाव]] आणि [[बौद्ध तत्वज्ञान]]ाचा अभ्यास होता.
<ref>https://m.maharashtratimes.com/editorial/article/kingship/articleshow/70248445.cms</ref>


राजा ढाले हे [[भारिप बहुजन महासंघ]]ाच्या तिकिटावर १९९९ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर-मुंबई मतदारसंघातून उभे होते, पण निवडून आले नाहीत. २००४ साली यांनी त्याच पक्षाकडून ईशान्य मुंबई मतदारसंघातूनही एक अयशस्वी निवडणूक लढवली.
राजा ढाले हे [[भारिप बहुजन महासंघ]]ाच्या तिकिटावर १९९९ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर-मुंबई मतदारसंघातून उभे होते, पण निवडून आले नाहीत. २००४ साली यांनी त्याच पक्षाकडून ईशान्य मुंबई मतदारसंघातूनही एक अयशस्वी निवडणूक लढवली.

००:२७, १८ जुलै २०१९ ची आवृत्ती

राजा ढाले (जन्म: १९४० - निधन: १६ जुलै २०१९) हे आंबेडकरी चळवळीतील एक नेते, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक होते. ते दलित पँथरचे आक्रमक नेते होते, ही संघटना ज.वि. पवार, अरुण कृष्णाजी कांबळे आणि नामदेव ढसाळ यांनी स्थापन केली होती. त्याअगोदर ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या (भारिप) राजा ढाले गटाचे प्रमुख होते. त्यांनी फुले-आंबेडकरी विचाराचा पुरस्कार केला.[१]

कारकीर्द

पँथरमध्ये सामील होण्यापूर्वी ढाले 'लिटल मॅगझिन' चळवळीत सक्रिय होते. त्यांच्या नेतृत्वात इतर कार्यकर्त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा लढला. त्यानंतर दलित पँथरने अनेक लहान-मोठी आंदोलने केली. ढाले शुद्ध बौद्ध-आंबेडकरी विचारांचा पुरस्कर्ता होते. भदंत आनंद कौसल्यायन यांच्या संपर्कात आल्यानंतर तर बुद्ध विचाराचा ते प्रखर पुरस्कार करू लागले. त्यांनी 'दलित साहित्या'चा 'आंबेडकरवादी साहित्य' असा शब्द प्रयोग सुरू केला. ते नेता, मार्गदर्शक आणि आंबेडकरवादी चळवळीचा भाष्यकारही होते. तसेच ते चित्रकार आणि कवीही होते. त्याचे वाचन दांडगे होते. त्यांच्याकडे पुस्तकाचा मोठा संग्रह होता. पँथरनंतर दिशाहिन झालेल्या आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचे काम त्यांनी केले.[२] राजा ढालेंचा झेन, महानुभाव आणि बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास होता. [३]

राजा ढाले हे भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर १९९९ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर-मुंबई मतदारसंघातून उभे होते, पण निवडून आले नाहीत. २००४ साली यांनी त्याच पक्षाकडून ईशान्य मुंबई मतदारसंघातूनही एक अयशस्वी निवडणूक लढवली.

जीवन

"एका दलित महिलेला विवस्त्र करून तिला अर्धा किमी धावायला लावलं. या गुन्ह्याची गुन्हेगाराला 50 रुपये दंडाची शिक्षा झाली. मात्र राष्ट्रध्वजाची अवमानना करणाऱ्याला 350 रुपये दंड झाला. म्हणजे आयाबहिणींच्या वस्त्राची किंमत राष्ट्रध्वजापेक्षा कमी आहे. मग त्याचं (राष्ट्रध्वजाचं) काय करायचं?" असा सवाल करून मोठा गहजब राजा ढालेंनी निर्माण केला होता. भारतीय स्वातंत्र्यालाच प्रश्न करणारा "काळा स्वातंत्र्यदिन" हा लेख यांनी लिहिला होता.[४]

लेखन

तापसी, येरू, चक्रवर्ती, जातक, विद्रोह आदी लघुअनियतकालिके आज उपलब्ध नाहीत. या अनियतकालिकांत राजा ढाले यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. तसेच त्यांच्या कविता, कथा, प्रस्तावना, प्रसंगोपात लेख, संशोधनात्मक लेखन आणि संपादने हे सारे साहित्य विखुरलेले आहे. ढालेंच्या आयुष्याचे तपशील फारसे उपलब्ध नाहीत. स्वतः ढालेंनीही हे निगुतीने जपण्याचा आणि प्रस्थापित होण्याचा खटाटोप केलेला नाही. असे मातीच्या उदरात लुप्त झाल्यासारखे परंतु आतमध्ये अद्याप जिवंत असणारे झरे शोधून त्याचे पाणी सर्वांपर्यंत आणण्याचे काम अतिशय दुष्कर असते. ते हाती घेणे हेच एक दिव्य असते. त्यामुळे ’खेळ’ या अंकातल्या काही त्रुटी मान्य करूनही त्याची दखल घ्यावी लागणार आहे.

पुरस्कार आणि सन्मान

  • राजा ढाले यांच्यावर ' खेळ ' या नियतकालिकाचा विशेषांक प्रकाशित झालेला आहे.
  • जीवनगौरव पुरस्कार (कुणाकडून?)
  • पुणे महापालिकेचा आंबेडकर पुरस्कार (१-१०-२०१५)

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी