विकिपीडिया:कौल/कौल प्रक्रिया मुदत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१ कोणताही कौल घेण्यासाठी विकिपीडिया:कौल येथे प्रस्ताव मांडला जावा.

१.१ उत्पात आणि खोडसाळ प्रस्ताव प्रचालक काढून टाकतील. इतर सदस्यांनी येथे फेरफार करू नये.

२ अपूर्ण, असंबद्ध किंवा अर्थबोध न होणारे प्रस्ताव विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे हलविले जातील.

२.१ इतर सदस्यांनी प्रस्तावात फेरफार करू नये.

३ विकिपीडियावरील धोरणांशी थेट संबंध असलेल्या प्रस्तावांकडे विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे येथून दुवा असेल.
४ कौल प्रस्ताव मांडला गेल्यानंतर पुढील १४ दिवस (प्रस्ताव मांडलेला दिवस वगळून) त्यावर चर्चा करण्यात येईल. ही मुदत शेवटच्या दिवशी २३:५९:५९ वाजता संपेल. या दरम्यान सदस्य आपला कौलही नोंदवू शकतील.

४.१ १४ दिवसांची चर्चा मुदत संपायच्या आत प्रस्ताव मांडणारा सदस्य ७ अधिक दिवसांची मुदत एक वेळा मागू शकतो.
४.२ १४ किंवा २१ दिवसांच्या मुदतीअखेर चर्चेत खंड पडला नसेल आणि नवनवीन मुद्दे समोर येत असतील (असे होत आहे कि नाही यासाठी प्रचालकांचे मत अंतिम राहील) तर प्रचालक आपणहून एक वेळा ७ अधिक दिवस चर्चा पुढे चालू ठेवू शकतील.

५ चर्चाकाळ संपल्यावर पुढील ७ दिवस सदस्य कौल देतील. ही मुदत सातव्या दिवशी २३:५९:५९ वाजता संपेल. या दरम्यान शक्यतो चर्चा करू नये. पूर्वी न मांडलेले आणि मूलभूत मुद्दे असतील तर ते मांडावे परंतु मी सहमत, मी ही सहमत इ. मते किंवा मांडलेल्या मुद्द्याला अधिक बळ देणे शक्य तितके टाळावे.
६ कौल देण्याची मुदत संपल्यावर प्रचालक मते मोजून निकाल जाहीर करतील.

६.१ कौलमोजणीमधून मुदतीनंतर दिले गेलेले कौल आणि इतर अवैध कौल वगळले जातील.

(याबाबतचा मूळ प्रस्ताव, त्यावर झाले विचारमंथन, मतदान, निकाल व इतर माहिती येथे उपलब्ध आहे.)