उकडणे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
उकडणे किंवा वाफवणे (इंग्लिश: Steaming, स्टीमिंग ;) ही वाफेच्या माध्यमातून अन्न शिजवण्याची एक पाकप्रक्रिया आहे. उकडणे ही आरोग्यास हितकारक पाकप्रक्रिया असल्याचे मानले जाते. जगभरातील विविध मानवी समूहांमध्ये व संस्कृतींमध्ये ही प्रक्रिया पाकसंस्कॄतीचा महत्त्वाचा भाग असून या प्रक्रियेने बहुतेक सर्व अन्नपदार्थ शिजवता येतात.
रीत
[संपादन]पाण्याचा उत्कलनबिंदू १०० अंश सेल्शियस असतो. त्यामुळे जे अन्नपदार्थ उच्च तापमानाला खराब व्हायची शक्यता असते, ते अन्नपदार्थ या तापमानास न बिघडता सहज शिजतात. या प्रक्रियेत एखाद्या भांड्यात किंवा प्रेशर कुकरसारख्या वाफवण्याच्या यंत्रात थोडे पाणी टाकून, त्यावर अन्नपदार्थ ठेवले जातात. सहसा अन्नपदार्थ पाण्याच्या संपर्कात येऊ न देता भांड्यात अन्य आधारावर तोलला जाईल, अशा बेताने ठेवला जातो. भांड्याचे झाकण लावून त्यास विस्तवावर ठेवले जाते.