वरप्रस्थान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वरप्रस्थान हे हिंदू लग्नपद्धतीमधील एक विधी आहे.

वरपक्ष वाजतगाजत वधूगृही जातो. मंडपप्रवेशद्वारावर वरास पंचारती ओवाळून सुवासिनी त्याचे स्वागत करतात. नवरदेवास मंडपात समारंभपूर्वक नेऊन चौरंगावर बसतात. शुभ मुहूर्ताची योग्य वेळ कळण्यास्तव पुरोहित घटिकापात्राची योजना करतो. मंगलाष्टके लग्न लागण्याचा प्रारंभी नवरदेव पूर्वाभिमुख उभा राहतो. त्याचे समोर स्वस्तिक चिन्ह रेखांकित केलेला अंतरपाट धरतात. वराच्या पुढ्यात अंतरपाटाच्या दुसऱ्या बाजूला नवऱ्या मुलीस उभी करतात. पुरोहित मंगलाष्टके पठन करीत असताना वधू-वरांच्या हातात पुष्पहार असतात. शुभ मुहूर्ताचा क्षण येताच मंगलाष्टक पठन बंद होते. पुरोहित अंतरपाटा उत्तरेकडे ओढून घेतात. वादक वाजंत्री वाजवतात आणि आमंत्रित पाहुणे वधू-वरांवर अक्षता टाकतात. प्रथम वधू वरास वरमाला घालते. नंतर वर वधूस पुष्पहार घालतो; तसेच तिच्या गळ्यात मंगलसूत्र बांधतो. मंगलसूत्रबंधानाने वधू विवाहबंधनात अडकते. कन्यादान कन्यादान विधिद्वारे वधूपिता आपल्या कन्येचे पवित्र दान करतो. आपल्या कन्येची धर्म, अर्थ आणि कर्माचे बाबतीत कुठल्याही प्रतारणा करू नये असे वधूपिता वरास आवर्जून सांगतो. `नातिचरामि' या शब्दांनी नवरदेव प्रतिसाद देतो.