लीलावती (ग्रंथ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लीलावती हा भास्कराचार्य यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. तो त्यांनी आपली एकुलत्या एक मुलीच्या नावाने लिहिला. लग्न झाल्यावर मुलीस वैधव्य आल्याने ती पितृगृही आली. भास्कराचार्यांनी तिला गणित शिकवले.

वर्णन[संपादन]

या ग्रंथात एकूण २७८ श्लोक आहेत. त्यात ब्रह्मस्फुट, गणित-पाश आदी प्रकरणे आहेत. या ग्रंथाच्या लेखनात भास्कराचार्यांनी लेखनाची ललित शैली अंगिकारली आहे. त्याने गणितासारखा रुक्ष विषय सोपा झाला आहे असे मानतात. या ग्रंथात अंकगणित, महत्त्व-मापन, क्षेत्रफळ, घनफळ, संख्यांची स्थानसंज्ञा, गणितातील मूल क्रिया(फंडामेंटल ऑपरेशन्स), प्रतीलय, त्रिमिती भूमिती, शंकुछाया अश्या अनेक प्रकारांचा समावेश आहे.

टीकाग्रंथ (भाष्य)[संपादन]

या ग्रंथाचे अनेक भाषांत भाषांतर झाले आहे. त्यावर, नंतरच्या गणितज्ञांनी अनेक टीकाग्रंथही लिहिले आहेत. त्यातील महत्त्वाचे:

  • गणितामृत सागरी (गंगाधर)
  • बुद्धिविलासिनी (गणेश दैवज्ञ)
  • लीलावती भूषण (धनेश्वर दैवज्ञ)
  • लीलावती विवृत्ती (मुनीश्वर)

भाषांतर[संपादन]

या ग्रंथाचे अबुल फैजी याने १८५७ साली फारसीत भाषांतर केले.

इ. स. १८१६ला डॉ. जॉन टेलरने 'लीलावती'चे इंग्रजीत भाषांतर केले.