लई भारी (संकेतस्थळ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लई भारी हे इ.स. २०१० साली चालू झालेले मराठी भाषेतील सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे.

मराठी फेसबुक[संपादन]

लईभारी.कॉम हे मराठी सोशल नेटवर्किंग ४ नोव्हेंबर, इ.स. २०१० रोजी चाचणी स्वरूपात सुरू झाले आणि १,५०,०००हून अधिक सदस्यसंख्या झाली आहे[१][२][३] सचिन वाझे यांच्या संकल्पनेतून मराठी फेसबुक आकारास आले. तरुणाईने कॉलेजच्या अभ्यासापासून ते राजकारण, प्रेम, सहकार क्षेत्र तसेच 'मी मराठा' पासून ते 'खानदेशी' पर्यंतच्या विविध चर्चा, समूह यामध्ये आले आहेत. हा उपक्रम सचिन वाझे यांच्यासह संयोग शेलार, सुमीत राठोड, महेश संभेराव, आशिष खटावकर, प्रथमेश सावंत, संकेत परब, जयश्री रेडकर, पिनाकिन रिसबूड, सत्यजित घागरे, अवधूत चव्हाण यांनी साकारला आहे. लईभारी.कॉम ने दिनांक २० जुलै इ.स. २०१२ रोजी इमेल सेवा चालू केली आहे. हे संकेतस्थळ सध्या बंद आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ ""फेसबुकला लई भारी टक्कर - सकाळ २४ नोव्हेंबर, इ.स. २०१०"". Archived from the original on 2012-03-08. 2010-11-25 रोजी पाहिले.
  2. ^ "मराठीचे लई भारी पाऊल - महाराष्ट्र टाइम्स २५ नोव्हेंबर, इ.स. २०१०"
  3. ^ फेसबुक लई भारी - पुढारी २६.११.२०१०"[permanent dead link]