राष्ट्रीय संरक्षण निधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राष्ट्र संरक्षणात येणारी मदत व त्याचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय संरक्षण निधीची स्थापना करण्यात आली आहे. या मध्ये मिळालेला निधी सशस्त्र सेनादलातील सैनिक (निमलष्करी दलातील सैन्य अंतर्भूत) व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाकरिता वापरला जातो. या निधीचे भारताचे पदसिद्ध पंतप्रधान अध्यक्ष असतात. हा निधी पूर्णपणे लोकांनी दिलेल्या देणग्यांवर अवलंबून असून यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्याही स्वरूपाची तरतूद नसते.

ठळक वैशिष्ट्ये[संपादन]

भारतीय सेना दल तसेच निमलष्करी दलासाठी ही योजना आहे. संरक्षण दलाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना व विधवांना या योजने अंतर्गत मासिक शिष्यवृत्ती दिली जाते.

इतर मदत[संपादन]

  • सियाचीन बेस कॅम्प रूग्णालयात जवानांना वैद्यकीय मदत म्हणून सिटी स्कॅन मशीन
  • आयएनएस विराट विमानवाहू युद्धनौकांवर वैद्यकीय व फिटनेस सुविधा
  • इंफाळ मध्ये कुकी इन कॉम्प्लेक्समध्ये ग्रंथालय व समाजमंदिर तथा संग्रहालयाची निर्मिती