पहिला राज वोडेयार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राजराज वडियार पहिला या पानावरून पुनर्निर्देशित)
पहिला राज वोडेयार
मैसुरुचा ९वा राजा
अधिकारकाळ १५७८
अधिकारारोहण १५७८
राज्याभिषेक १५७८
राजधानी मैसुरु
पदव्या महा मंडलेश्वर बिरुद-अंतम्बरा-गंदा राजा राज वोडेयार
जन्म २ जून, १५५२
मृत्यू २० जून, १६१७
मेलिकोटे
पूर्वाधिकारी पाचवा चामराज वोडेयार
' सहावा चामराज वोडेयार
उत्तराधिकारी सहावा चामराज वोडेयार
वडील चौथा चामराज वोडेयार
संतती युवराज नरसराज, दुसरा राज वोडेयार
राजघराणे वडियार घराणे
धर्म हिंदू

पहिला राज वोडेयार पहिला (२ जून, १५५२ - २० जून, १६१७:मेलिकोटे) हा मैसुरुचा नववा राजा महाराजा होता. हा चौथ्या चामराज वोडेयारचा मोठा मुलगा होता. हा आपल्या चुलत भाऊ पाचव्या चामराज वोडेयारच्या मृत्यूनंतर १५७८ पासून १६१७ पर्यंत सिंहासनावर होता.

विजयनगराच्या राजदूतांची हकालपट्टी[संपादन]

आपल्या काका आणि वडीलांनी सुरू केलेले विजयनगरच्या राजदूतांना मैसुरु राज्यातून हाकलून देण्याचे काम राज वोडेयारने सुरू ठेवले. या दरम्यान त्याला स्वतःच्याच कुटुंबाकडूनही विरोध होता. राज वोडेयारने मैसुरुला विजयनगरपासून पूर्णपणे स्वतंत्र असल्याचे जाहीर केले. असे असताही त्याने विजयनगरच्या सम्राट व साम्राज्याला आदर दिला होता.

मैसुरु दसरा[संपादन]

पहिल्या राज वोडेयारने दर दसऱ्याच्या दिवशी आपल्या महालापासून बन्नीमंटप मधील शमीच्या झाडा पर्यंत मिरवणूक काढणे सुरू केले. आता याला जगप्रसिद्ध मैसुरु दसऱ्याचे रूप आहे.

ही प्रथा १६१०पासून आजतगायत अखंड सुरू आहे. राज वोडेयारचा युवराज नरसराज नवरात्रीच्या आधी एक दिवस मृत्यू पावला असताही विद्वानांच्या सल्ल्यावरून राजाने यात खंड पाडला नाही व भविष्यातही राजघराण्याील व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही या प्रथेत व्यत्यय आणू नये असे फर्मान काढले.