रवींद्र सेतु
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रवींद्र सेतु (हावरा पुल) हा हुगळी नदीवर बांधलेला कोलकाता शहरातील एक ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पुल आहे. हा पुल कोलकात्याला हावरा शहराशी जोडतो. इ.स. १९३७ ते १९४३ दरम्यान हावरा पुलाचे बांधकाम चालले. १९६५ साली पुलाचे नाव बदलुन रवींद्र सेतु ठेवण्यात आले पण अजुनही हावरा पुल ह्याच नावाने ओळखला जातो. रोज अंदाजे १.५ लाख वाहने व ४० लाख पादचारी ह्या पुलाचा वापर करतात.