रतनपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रतनपूर हे भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक गाव आहे. बिलासपूर या गावापासून पूर्वेस सुमारे २५ किमी अंतरावर रतनपूर नावाचे संस्थान पूर्वी होते. या संस्थानाची निर्मिती रतनराज (दुसरे नाव-रतनदेव) यांनी साधारणतः इ.सच्या दहाव्या शतकात केली असा कयास आहे.[ संदर्भ हवा ]. इ.स. १४०७मध्ये या संस्थानाचे दोन भाग पाडण्यात आले. रतनपूर व त्याची एक लहान शाखा रायपूर येथे झाली.

येथे एक देवीचे पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे. याचे नाव महामाया मंदिर आहे. राजा रतनदेव (पहिला) याने या मंदिराचे निर्माण कार्य इ.स. १०५०मध्ये केले. येथे एकाच मंदिरात महालक्ष्मी व महासरस्वती अशा मूर्ती आहेत. या देवळाचे मागच्या भागी महाकाली या देवतेची मूर्तीही आहे. या त्रिदेवी या परिसरातील अनेक लोकांचे कुलदैवत आहे. हे देवींचे संस्थान वैभवशाली आहे.

येथील पूर्वीचे राजा कछवाहकलचुरी यांचे हे कुलदैवत होते.

येथे जवळच रतनपूरचा किल्ला देखील आहे.येथे देखणी पण भग्नावस्थेत असणारी शिल्पे आहेत.[१]


संदर्भ[संपादन]

  1. ^ लेखक - डॉ. उदय राजहंस. दिनांक-०९/१०/२०१६ - तरुण भारत - ई पेपर - आसमंत पुरवणी पान क्र. ८ 'रतनपूर Check |दुवा= value (सहाय्य). २०१६-१०-१६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]