मोबिलायझिंग इंडिया:ओमेन म्युझिक अँड मायग्रेशन बिट्वीन इंडिया अँड त्रिनिदाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोबिलैझिंग इंडिया:ओमेन मुसीक अंड मैग्रेसोन बिटवीन इंडिया अंड त्रिनिदाद हे तेजस्विनी निरांजना लिखित पुस्तक डीउक युनिवेरसीती यांनी २००६ मध्ये प्रकाशित केले आहे. भारताच्या इतिहासाचा विचार वेगळ्या पद्धतीने करण्याकरिता हे पुस्तक उद्युक्त करते. विसर पडलेल्या व अवैध भारतीय म्हणवल्या गेलेल्या स्थलांतरित श्रमिकांच्या नजरेतून आधुनिक भारताच्या प्रस्थापित इतिहासाकडे बघत भारतातील आधुनिक सांस्कृतिक अस्मितांची पुर्नकल्पना हे पुस्तक करताना दिसते.

प्रस्तावना[संपादन]

स्थलांतरित करारतत्त्वावरील श्रमिक कामगार भौगोलिकदृष्ट्याही भारतापासून अंतरावर असले तरी त्यांनी स्वतःचे वेगळेपण टिकवणे व स्वतःला सातत्याने 'भारतीय' म्हणवून घेणे हे आपल्या राष्ट्रवाद,हिंदू -मुस्लिम,जात- संस्कृती स्त्रीत्व- सार्वजनिक क्षेत्र याबद्दलच्या भारतीयपणाच्या ज्या निश्चित धारणा आहेत त्याला आव्हान देणारे कसे ठरते हे 'राष्ट्र' या संकल्पनेची चिकित्सा केलेली दिसते. राष्ट्राबाबतचा हा टीकात्मक दृष्टीकोन १९७०-१९८० या काळात,मार्क्सवादी- लेनिनवादी व स्त्रीचळवळीतून उभ्या राहिलेल्या जहाल राजकारणातून पुढे आलेला दिसतो.


प्रस्तावनेमध्ये पुस्तकनिर्मितीची पार्श्वभूमी सांगताना लेखिका स्पष्ट करतात की, हे पुस्तक एका संशोधन प्रकल्पातून साकार झालेले आहे. संशोधनाच्या क्षेत्रामध्ये, दक्षिण गोलार्धाकडून खूप काही शिकण्यासारखे नसते हे गृहीतक पक्के करूनच केवळ पहिल्या जगाकडे ज्ञानक्षेत्र म्हणून बघितले जाते. म्हणूनच बव्हंशी संशोधकांना पहिल्या जगाला संशोधनभेटी देण्याकरता अनुदानही उपलब्ध करून दिले जाते. तेजस्विनी निरांजना या पुस्तकाच्या माध्यमातून या गृहीतकाची पुर्नचिकित्सा करतात व दक्षिण गोलार्धाच्या तुलनात्मक अभ्यास संशोधनाचे महत्त्व स्पष्ट करतात.

ठळक मुद्दे[संपादन]

पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणामध्ये, कॅरीबिया मधील करारतत्त्वावर गेलेल्या व स्वतःला भारतीय म्हणवणाऱ्या श्रमिकांद्वारे 'subaltern diaspora' या संकल्पनेची ओळख लेखिका करून देतात. भारतामध्ये या कारारतत्त्वावरील कामाविरोधी जी राष्ट्रीय मोहीम उभी राहिली ती, श्रमिक महिलांच्या लैंगिकतेभोवती कशी फिरते याचा वेध दुसऱ्या प्रकरणामध्ये घेतलेला आहे. तर इतर प्रकरणांतून लेखिकेने तिच्या लोकप्रिय संगीताच्या लोकलेखा अभ्यासपद्धतीची मांडणी केलेली आहे.


या पुस्तकाच्या माध्यमातून दक्षिण गोलार्धाच्या तुलनात्मक अभ्यासाकरिता एक संकल्पनात्मक अभ्यासचौकट देण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला आहे. याकरिता त्यांनी साहित्य अभ्यास, स्त्रीवादी सिद्धांत, मानववंशशास्त्र,संगीतशास्त्र,चित्रपट अभ्यास या सर्व आंतरज्ञानशाखांशी संशोधन जोडलेले आहे. या पुस्तकाचा उद्देश केवळ भारतीय व कॅरीबियन ऐतिहासिक दुवे,साम्य व भिन्नत्व पाहणे हा नसून या दोन्ही वेगवेगळ्या स्थानांत एकमेकांच्या खुणा कश्या टिकून राहतात,जसे की, कॅरीबियनमध्ये 'भारतीयत्व' कसे वेगळेपण जपते हे पाहणे हा आहे. पाश्चात्य आधुनिकता हीच केवळ दक्षिण गोलार्धाची चिकित्सात्मक तुलना करण्याची वैध अभ्यासपद्धती आहे हे मिथक फोडण्याचा प्रयत्न निरांजना या पुस्तकाच्या माध्यमातून करू इच्छितात.

प्रतिसाद[संपादन]

या पुस्तकाचे योगदान, विविध पुस्तकांमध्ये झालेल्या त्याच्या पुनरावलोकनाच्या आधारावर रेखाटता येईल. वेस्ट इंडीस विद्यापीठातील एका अभ्यासकाच्या मते,

"त्रिनिदादच्या लोकप्रिय संगीतात इस्ट इंडियनसची लैंगिकता व सांस्कृतिक ओळख कशा पद्धतीने दर्शवली गेली याचे यशस्वी व कौशल्यपूर्ण चित्रीकरण लेखिकेने केलेले आहे.' (जेरोम टीलुकसिंघ Archived 2016-02-20 at the Wayback Machine.)

जेरोमच्यामते सांस्कृतिक अध्यापनक्षेत्रात (Cultural Studies) नवीन विषयांवर अभ्यास करताना सदरचे पुस्तक उपयोगी ठरू शकते. त्याच धर्तीवर ‘केनेडीअन जरनल ऑफ लेटीन अमेरिका अंड कॅरीबियन स्टडीस (Canadian Journal of Latin America and Carribean Studies)’ मधील एक पुनरावलोकनार्थी मांडतात कि वैश्विक दक्षिणार्थाला तुलनात्मक सांस्कृतिक संशोधन करण्याचे आदर्श घालून देण्यास हे पुस्तक यशस्वी राहिलेले आहे.

या पुस्तकाचे पुनरावलोकन 'Ethnomusicology' या मासिकात करताना पुनरावलोकनार्थी ‘विदेशात राहणारे दक्षिण आशियातील लोकांवर(South Asian Diasporas)’ व ‘केरिबियन अध्यापनातील (Carribbean Studies)’ अभ्यासकांना हे पुस्तक सुचवतात.

मॅनुएलच्या मते लेखिकेनी सदरचा अभ्यास हा त्रिनिदाद मध्ये सखोल कार्यक्षेत्रातील काम व ग्रंथालयात केलेल्या संशोधनाच्या आधारे केलेले दिसते तसेच लेखिकेची समकालीन मानववंशशास्त्र व साहित्यातील सिद्धांकनावरची पकड सुद्धा या अभ्यासात प्रतिबिंबित होते. (मॅनुएल, २००९)

महत्त्वाच्या संकल्पना[संपादन]

कंत्राटी कामगार

कॅरीबेअन अभ्यास

राष्ट्रवाद

जागतिक उत्तर/ जागतिक दक्षिण

आंतर सांस्कृतिक अभ्यास

सबाल्टर्न अध्ययन

स्त्रीवादी सिद्धांकन

संगीत विद्या

संदर्भ सूची[संपादन]

Brereton Bridget, Canadian Journal of Latin American and Caribbean Studies, Vol. 33, No. 65, Special Issue on Human Security (2008), pp. 230-232

Manuel Peter, Ethnomusicology, Vol. 53, No. 1 (WINTER 2009), pp. 144-146

Teelucksingh Jerome, The University of the West Indies.

हे सुद्धा पहा[संपादन]

राष्ट्रवाद

स्त्रीवादी सिद्धांकन