Jump to content

मॉल ऑफ अमेरिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मॉल ऑफ अमेरिका हा अमेरिकेतील ४२ लाख चौरस फुट जागेवर २५ लाख चौरस फुट बांधकाम असलेला हा मॉल साधारण आयताकृती आकाराचा आहे. ३ मजले आणि एका बाजूला ४ मजले बांधकाम असलेल्या या मॉल मध्ये ५२० दुकाने आहेत. मिनेसोटा राज्यामध्ये हिवाळ्यात नेहमीच शून्यापेक्षा खाली तापमान जात असूनही हा मॉल वातानुकुलित नाही. फक्त प्रवेश द्वार सोडल्यास बाकी सगळीकडे नैसर्गिक हवा संचारत असते. दिवे, इतर विजेची उपकरणे, येणारी माणसे आणि इथे काम करणारी मंडळी येथील हवामान योग्य पातळीत ठेवतात. दर वर्षी ४ कोटी लोक या मॉलला भेट द्यायला येतात.

इतिहास

[संपादन]
मॉल ऑफ अमेरिका - लोगो

ग़्हेर्मेज़िअन कुटुंबाच्या ट्रिपल ५ ग्रुपच्या मालकीचा हा असून १९९२ साली हा सर्वांसाठी खुला करण्यात आला. ७ मजली पार्किंगच्या जागेमध्ये साधारणपणे २०००० वाहने बसायची सोय केलेली आहे. दुसऱ्या टप्प्याध्ये अजून ८००० पार्किंग वाढवण्याचा बेत आहे. पण दुसऱ्या टप्प्याचा खर्च २ अब्ज डॉलर असल्याने त्यांनी सध्या त्याचे काम सुरू केलेले नाही. पैशाची कमतरता आणि आर्थिक मंदीमुळे हा बेत लांबणीवर पडला आहे. आता प्रांतातील कर वाढवून पैसा गोळा करायचे प्रयत्न चालू आहेत.

दुसरा टप्पा

[संपादन]

मॉल ऑफ अमेरिका मध्ये एक थीम पार्क आहे. मुलांना आणि मोठ्यांनाही मजा करता येईल. तसेच पाण्याखाली मत्स्यालयची ही मजा घेता येते.टाचणी पासून टीवी पर्यंत आणि देशोदेशीच्या झेन्ड्यापासून कपड्यापर्यंत एका ठिकाणी सर्व काही मिळायची सोय येथे आहे. फार दमला तर बसायची आणि क्षुधा-शांती गृहाची पण सोय आहेच. मुलांना आवडणारे थीम पार्क असल्याने पालक नेहमीच इकडे येतात.