मिर्झा गालिब
मिर्झा असदुल्लाखान गालिब ( २७ डिसेंबर १७९७, १५ फेब्रुवारी १८६९) एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे धडे घेतले, फारसी भाषा शिकले.
गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्वज्ञान त्यांनी मांडले. त्यांनी एकूण १८,००० च्या वर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १,०००-१,२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले.
गालिब यांनी कधी कोणताही उद्योग-धंदा केला नाही. मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या सहकार्याने ते राहत. त्यांना स्वतःला प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तर मोगल काळातील राजांच्या, उमरावांच्या दरबारी जाणेही त्यांना आवडत नसे. ते म्हणत माझ्या कविता माझ्या मृत्युनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार.
[संपादन] गालिब यांच्या रचना
दीवान-इ-गालिब (१८४१) उर्दू
कुल्लियत-इ-गालिब (१८४५) फारसी
कातिअ-ह-बुर्हान (१८६१) फारसी ग्रंथ
मिहर-ह-नीमरोज (१८५४) फारसी ग्रंथ
कल्लियत-ह-नस्र (१८६८) फारसी ग्रंथ
उद-द-हिंदी (१८६८) उर्दू ग्रंथ
उर्दू-द-मुंआल्ला (१८६९) उर्दू ग्रंथ
