मराठी विकिपीडिया एक ज्ञानकोश असून आपण या संपादन कृतीत निवडलेली शीर्षक लेखन पद्धती विकिपीडिया लेखन शैलीशी सध्या सुसंगत नसण्याची शक्यता स्वयमेव संपादन गाळणीने व्यक्त केली आहे.
विकिपीडिया ज्ञानकोशात व्यक्तीबद्दलचा लेख तयार करताना मूळ लेखपानाचे शीर्षकात अद्याक्षरे टाळावीत, त्यांच्या संपूर्ण नावाने शीर्षक ठेवावे असा लेखन संकेत आहे.
उपनामे, उपाख्य, पदवीसह लिहिलेले शीर्षक असू नये.खालील सर्वच प्रकार शीर्षकात टाळावे: [१]
व्यक्तीबद्दलचा लेख तयार करताना त्याच्या संपूर्ण नावाने मूळ पान ठेवावे. उपनामे, उपाख्य, पदवीसह लिहिलेले शीर्षक असू नये.[अक्षरानुरूप वर्गीकरणात अडचण येते(alphabetical categorisation)].
व्यक्तीस विश्वकोशीय उल्लेखनीयता आहे म्हणूनच विकिपीडिया ज्ञानकोशात लेख असतो.ज्ञानकोशाच्या वाचकास विशेषण पदव्यांनी संपादकाची आणि ज्ञानकोशाचा सॉफ्ट कॉर्नर आहे असे वाटल्यास अथवा निष्पक्षता बाधीत होते आहे असे वाटल्यास विशेषण पदव्यांचा ज्ञानकोशाची विश्वासार्हता बाधीत होण्या पलिकडे काहीही फायदा होत नाही.ज्ञानकोशाचे काम वस्तुनिष्ठ माहिती देण्यापर्यंत मर्यादीत आहे.व्यक्तीत्वे स्वकतृत्वावर अवलंबून असतात.त्यांच्या कतृत्वा/कार्याबद्दल वस्तुनिष्ठ माहिती वाचल्या नंतर वाचकाच्या मनात आपोआप सुयोग्य जागा निर्माण होते.त्याकरता ज्ञानकोशाच्या संपादकांनी आपले सॉफ्ट कॉर्नर त्यात मिसळण्याबद्दल विचार करण्याचा मोह टाळलेला बरा
अजून एक महत्वाची बाजू, नवीन येणाऱ्या सदस्य वाचकांना/संपादकांना सर्वसामान्य इतर लेखन क्षेत्रांपेक्षा ज्ञानकोशीय परीघ वेगळा आहे आणि त्यास मर्यादा आहेत याची ओळख लेख वाचताना सुरवाती पासून राहील्यास.पुढे नवागत संपादक लेखन चालू करतात तेव्हा त्यांना येथे निष्पक्षतेच्या आणि विवीध ज्ञानकोशीय मुल्यांचे भान सातत्याने रहाण्यास मदत होते म्हणूनही उपरोक्त शीर्षकलेखन संकेत होता होईतो पाळले जाणे गरजेचे असते.
....नावांचे संक्षेप न वापरता ती नावे पूर्णपणे वापरली जातील, याविषयी दक्षता घेतली जाईल. हा उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने अशा प्रकारची नावे देताना ती अनेक पदव्या वगैरेसह लांबलचक न होता सुटसुटीत असावीत, असा प्रयत्न राहील.-महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतीक धोरण २०१०[२]
भारतीय संघ शासनाने अथवा भारतीय शासकीय संस्थांनी दिलेले पुरस्कार जसे पद्मश्री इत्यादी हे उपाधी नव्हेतच त्यामुळे ते नावांच्या आधी वापरले जाणे अभिप्रेत नसते.
स्वत: बद्दलचा लेख लिहू नये. स्वत:चे हितसंबध असलेल्या विषयास पुरस्कृत करणारे लेखन आणि (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. हितसंघर्ष किंवा हितसंबंध असलेल्या लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते.
व्यक्तीबद्दलचा लेख तयार करताना त्याच्या संपूर्ण नावाने मूळ पान ठेवावे. उपनामे, उपाख्य, पदवीसह लिहिलेले शीर्षक असू नये.[अक्षरानुरूप वर्गीकरणात अडचण येते(alphabetical categorisation)]. प्रचलित नाव मूळ नावापासून वेगळे असल्यास प्रचलित नाव नि:संदग्धीकरण पानांवर नमूद करावे व त्या नावावर टिचकी मारल्यास ते मूळ नावाकडे जाण्याची व्यवस्था करावी.
जर आवश्यकता भासली तर उपनामे, उपाख्य, पदवीसकट नाव, इ.चे पुनर्निर्देशन या पानाकडे करावे. उदा.
अशुद्ध लेखन असलेली शीर्षके शुद्धलेखन असलेल्या शीर्षकाकडे स्थानांतरित करावीत आणि अशुद्ध लेखन असलेले शीर्षक वगळावे. परंतु लोक अशुद्धलेखन असलेले शीर्षक पुन्हा पुन्हा निर्माण करत राहिले, तर मात्र ते पान तसेच ठेवून शुद्धलेखन असलेल्या व्यवस्थित शीर्षकाकडे पुनःर्निदेशित करावे.