माया मोशन पिक्चर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


माया मोशन पिक्चर्स : एक मराठी निर्मिती संस्था. दिनांक १ जानेवारी २०१७ रोजी ॲड. के. एस. थोरात व श्री. राजकुमार शिवाजी थोरातयांनी या संस्थेची स्थापना केली. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या या दोन भावांनी आपले लहानपणीचे स्वप्न साकार करण्यासाठी अविरत कष्ट उपसले. अतिशय भीषण व कठीण परिस्थितीला सामोरे जात त्यांनी कोणाच्याही मदतीशिवाय चित्रपट बनवण्याचे ठरवले. त्यांच्या या कष्टांना यशही आले. या त्यांच्या प्रयत्नाचा परिपाक म्हणजेच माया मोशन पिक्चर्स या बॅनर खाली बनवलेला पोरखेळ हा पहिला मराठी चित्रपट होय. नुकतेच त्याचे सेन्सॉर सर्टिफिकेशन ही झाले आहे. आता तो रिलीझच्या मार्गावर आहे.

जगात जगणारे लोक अनेकदा वेगळे जग तयार करण्याचा अट्टहास करतात. त्यांच्या यशाची ग्वाही देता नाही आली तरी प्रत्येकजण मात्र हे निश्तिचपणे सांगू शकतो की, ते जगावेगळे जगले. काहीतरी नवीन करण्यासाठी नाही, तर सुनियोजित नवीन करण्यासाठी ही निर्मिती संस्था स्थापन्यात आली आहे. एक प्रामाणिक उद्देश घेऊन ही संस्था निर्माण करण्यात आली आहे. दारिद्र्याने गांजलेल्या, आत्मभान नसलेल्या मराठी तरुणांना एक दिशा देण्यासाठी, त्यांच्यातील ऊर्जेला, कलेला जागतिक ओळख देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. केवळ तरुणच नाही तर कलाप्रेमी हर मनुष्य या संस्थेशी आपलं नाते जोडू शकतो.

या संस्थेचे भविष्यात अनेक प्रोजेक्ट्स आहेत. ज्यात हृदयस्पर्शी भोवताल, अभिजात कला यांचं चित्रण असणार आहे.