महिलांचा महानगरपालिकेतील राजकीय सहभाग
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
मुंबई महानगरपालिका पातळीवरील महिलांचा सहभाग
[संपादन]मुंबई महानगरपालिकेमध्ये महिलांना सत्तेत वाटा मिळण्यास नव्वदचे दशक उजाडावे लागले. या दशकातील ७३ व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीनंतर महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षणाच्या धोरणामुळे सत्तेत वाट मिळाला. कॉग्रेस पक्षाकडून सुलोचना म. मोदी या केवळ एका महिलेस पन्नाशीच्या दशकात (१९५६-१९५७) महापौर पद दिले गेले होते. त्या काँग्रेस पक्षाकडून मुंबईच्या पहिल्या महापौर झाल्या होत्या. त्यानंतर १९९४-९५ मध्ये काँग्रेस पक्षाकडून निर्मला सावंत यांना महापौरपद दिले गेले होते. यानंतर मुंबई मनपामधील काँग्रेस पक्षाची परंपरा खंडित झाली. शिवसेना पक्षाच्या विशाखा राऊत (१९९७-९८), शुभा राउळ (२००७-२००९) आणि शारदा जाधव (१ डिसेंबर २००९ ते ८ मार्च २०१२) या तीन महिला महापौर झाल्या होत्या. यापैकी विशाखा राऊत यांना मनोहर जोशी यांचा पाठीबा होता. शुभा राउळ आणि शारदा जाधव यांना राजकीय पार्श्वभूमी नव्हती. शारदा जाधव यांचे सासरे नगरसेवक होते. जाधव यांचा मनोहर डेकोरेटर आणि टूर एजन्सी हा व्यवसाय होता. तर दहिसरच्या शुभा राउळ पेशाने डॉक्टर होत्या.