Jump to content

महिला आरक्षण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महिला आरक्षण हे एखाद्या क्षेत्रात महिलांना संधी देण्यासाठी केलेली व्यवस्था आहे.

भारतातील निवडणुका

[संपादन]

भारत देशात कर्नाटक राज्याने प्रथमच १९८० मध्ये जिल्हा परिषदेमध्ये महिलांसाठी २५% जागा आरक्षित केल्या. असा कायदा केल्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत अनेक जागा रिकाम्या राहिल्या कारण अशा महिला आरक्षित जागांवर उभे रहाण्याची संधी घेणाऱ्या महिलाच नव्हत्या. १९८७ मध्ये ओरिसाने महिलांसाठी ३३% आरक्षण केले.

केंद्र सरकारने ७३ वी घटना दुरुस्ती करून जेव्हा महिला आरक्षण लागू केले, त्यापूर्वीच या राज्यांनी त्या दिशेने जाणारी पावले टाकली होती.