ब्राउमिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Fabales - Brownea coccinea x latifolia - kew 2

ब्राउनिया (शास्त्रीय नाव: Brownea grandiceps jacq. Caesalpiniaceae) हे उंचीने छोटे असलेले झाड अशोकाच्या झाडासारखे असते. याची पाने सीतेच्या अशोकासारखी असतात. छत्रीसारख्या पानोळ्यात लपल्यासारखी याची फुले जर्द केशरीलाल रंगाची असतात. जानेवारी ते मार्च महिन्यात हा वृक्ष फुलांनी बहरतो.याची कळी किंवा कळ्यांचा समूह सुंदर फळाप्रमाणे दिसतो. ब्राउनिया हे झाड विज्ञानसंस्थेच्या उद्यानात आहे. तसेच हे झाड उष्ण-दमट हवेत याची वाढ चांगली होते.

संदर्भ[संपादन]

वृक्षराजी मुंबईची - डॉ.मुग्धा कर्णिक