बी.टी. बियाणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बॅसिलस थरींगजिनेसीस या जिवाणुच्या नावाचे लघुरूप म्हणजे बी.टी.हा जिवाणू स्फटिक प्रथिने तयार करतो.ही प्रथिने अनेक बोंडअळीसाठी विषारी असतात. जैविक तंत्रज्ञानाद्वारे या जिवाणुच्या गुणसूत्राचा वापर करून पिकांची वाणे तयार करण्यात येतात. ती अनेक रोगप्रतिबंधक असतात. अशा पिकांवर बाहेरून बोंडअळीकरिता किटकनाशकांची फवारणी करण्याची गरज पडत नाही.[ संदर्भ हवा ] हा बी.टी. जिवाणू सर्वत्र सापडतो.

यातील विषद्रव्ये फक्त बोंडअळीलाच बाधीत करतात असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. या जिवाणुचा शोध सन १९०१ मध्ये जपानचे शास्त्रज्ञ 'ईशिवाता' यांनी लावला.त्यानंतर सन १९११ मध्ये जर्मनीचे एम्स्ट बर्लिनेर यांनी तो स्वतंत्रपणे शोधला.

वाद[संपादन]

अशा प्रकारे तयार केलेले पिकांचे वाण हे सर्व प्राणिमात्रांसाठी घातक असल्याचा आरोप करण्यात येत आहे.[ संदर्भ हवा ]भारतात याला तीव्र विरोध होत आहे.या वाणांमध्ये पुनर्निर्मितीची क्षमता नसल्यामुळे प्रत्येक वेळेस कंपन्यांचे बियाणेच विकत घ्यावे लागेल असा आरोपही होतो आहे.याने निसर्गचक्राला बाधा येईल असा अनेकांचा समज आहे.[ संदर्भ हवा ]पर्यावरणाचा समतोल ढासळेल असा दावाही टिकाकार करीत आहेत.[ संदर्भ हवा ]