बार्तुलुम्यू दियास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बार्तुलुम्यू दियासचा लंडनमधील पुतळा
बार्तुलुम्यू दियासचा सफरमार्ग (इ.स. १४८७ - १४८८)

बार्तुलुम्यू दियास (पोर्तुगीज: Bartolomeu Dias; १४५१ - २४ मे १५००) हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला सागरी मार्गाने पोचणारा प्रथम युरोपियन शोधक होता. दियासने मे १४८८ मध्ये केप ऑफ गुड होपचा शोध लावला.