बाबू गेनू सैद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बाबू गेनू या पानावरून पुनर्निर्देशित)

बाबू गेनू सैद (१९०९; महाळुंगे पडवळ - डिसेंबर १२, १९३०, मुंबई) हे एक भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले स्वातंत्र्यसैनिक होते. ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या चळवळीत महाराष्ट्रातल्या मुंबई शहरात ब्रिटिश माल वाहून नेणाऱ्या ट्रकाला रोखण्यासाठी ते रस्त्यावर आडवे पडले. १२ डिसेंबर १९३०ला अंगावरून ट्रक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत यात्रेस २० हजाराचा जमाव होता. सोनापूर (मुंबई) स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाह्य दुवे[संपादन]