फरीद शेख कॅमेरा संग्रहालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फरीद शेख कॅमेरा संग्रहालय हे हाजी फरीद शेख आमीर यांचे कॅमेरा संग्रहालय असून ते आग्नेय आशियामधील पहिले कॅमेरा संग्रहालय आहे. पहिल्या कार्डबोर्ड बॉक्स कॅमेऱ्यापासून तर आजच्या कॉम्प्युटराईज्ड कॅमेऱ्यापर्यंतचे असे ७००० प्रकारचे कॅमेरे या संग्रहालयात आहेत. हे संग्रहालय पुणे शहरात कोंढवा बुद्रुक येथे आहे.[१] १९९४ पासून संग्रहालय सर्वांना विनामूल्य पाहण्यासाठी खुले आहे.

फरीद शेख[संपादन]

इ.स. १९६८ मध्ये फरीद शेख १२ वर्षाचे असतांना त्यांच्या वडिलांनी त्यांना एक फोल्डिंगचा कॅमेरा दिला होता. त्या कॅमेराच्या छायाचित्रणातून त्यांनी कॅमेराचे प्रशिक्षण घेतले.[२] त्यांचे वडील चित्रकार होते. खडकीत त्यांच्या वडिलांचा इ.स.१९२० पासून न्यू रॉयल फोटो स्टुडिओचा व्यवसाय होता. फरीद शेख यांचे वडील हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे व लष्कराच्या  सदन कमांडचे अधिकृत फोटोग्राफर होते. इ.स.१९५३ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर संपूर्ण व्यवसायाची जबाबदारी फरीद शेख यांच्यावर आली.

इतिहास[संपादन]

या संग्रहालयात ७०० कॅमेरे, ४५ प्रोजेक्टर्स व २००  एनलार्जर आहेत. इ.स. १८१० - १८९४ सालांच्या वर्षाप्रमाणे कपाटात कॅमे-यांची मांडणी केलेली असून, सर्वांत जुन्या कॅमे-यांचा संग्रहालयात समावेश आहे. त्याचप्रमाणे कोडॅक, रोलिफ्लेक्स या कंपन्यांच्या पहिल्या कॅमे-यांपासून ते आताच्या नव्या मॉडेलपर्यंतचे सर्व कॅमेरे आहे. सर्व कॅमेरे चालू स्थितीत आहेत, उत्तम रिझल्ट देतात. ॲ्बस्क्युर कॅमेरा, पिनहोल कॅमेरा, बॉक्स कॅमेरा, फिल्ड कॅमेरा, रिफ्लेक्स कॅमेरा, जुळ्या भिंगाचा कॅमेरा, हातात धरण्याचा प्रेस कॅमेरा, स्टॅॅंड कॅमेरा, एरिअल कॅमेरा, पोलारॉईड कॅमेरा, स्पाय कॅमेरा, पाण्याखालील कॅमेरा, द्रुतगती कॅमेरा, मिनीएचर कॅमेरा १८८५, सिंगल लेन्स, ट्वीन लेन्स, सेल्फ टाइमर कॅमेरा १९४५, स्टॅंम्प कॅमेरा १९१०, दुसऱ्या महायुद्धात वापरलेला स्पाय कॅमेरा १९३८ असे बरेच कॅमेरे संग्रहात आहेत. शिवाय Hoe-Hohre हा ‘टाइम्स ऑफ इंडिया’चा पहिला कॅमेराही येथे आहे. तो मोठ्या ट्रंकेसारखा आहे. बीकानेरच्या महाराजांच्या कॅमे-याचाही संग्रहात समावेश आहे. कॅमे-यांना लागणा-या लेन्सेस, फिल्म ठेवण्याचे डबे, फिल्म धुण्याचे ट्रेदेखील संग्रहात आहेत. पाथे कंपनीचा फ्रान्समधील पहिला प्रोजेक्टर व Pillard bolex हा स्वित्झर्लंडमधील प्रोजेक्टरसुद्धा संग्रहात आहे. त्या प्रोजेक्टरसाठी संग्रहालयात वेगळे दालन आहे.[३]रोलीफ्लेक्स, कोडॅक, यशिका, निकॉन अशा अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे छोटे मोठे कॅमेरे कॅमेरे संग्रहालयात आहे. संग्रहालयात ॲॅंनलायझर आणि व्हिडीओग्राफीच्या कॅमेराचे स्वतंत्र विभाग आहेत.


संदर्भ[संपादन]

  1. ^ "कॅमेऱ्याचे संग्रहालय | थिंक महाराष्ट्र!". www.thinkmaharashtra.com. Archived from the original on 2020-01-02. 2020-01-02 रोजी पाहिले.
  2. ^ link, Get; Facebook; Twitter; Pinterest; Email; Apps, Other. "फरीद शेख कॅमेरा संग्रहालय". 2020-01-02 रोजी पाहिले.
  3. ^ rajesh. "कॅमे-याचे अनोखे संग्रहालय |" (इंग्रजी भाषेत). 2020-01-02 रोजी पाहिले.[permanent dead link]