पुष्य (नक्षत्र)
हे एक नक्षत्र आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पुष्य नक्षत्र एक शुभ नक्षत्र आहे.गुरुवारी पुष्य नक्षत्र आले असता "गुरुपुष्यामृत"हा शुभ योग होतो
हे सुद्धा पहा
[संपादन]भारतीय नक्षत्रमालिकेतील हे आठवे नक्षत्र असून याचा अंतर्भाव ⇨ कर्क राशीत होतो. यातील सर्वच तारे मंद आहेत. कर्केतील डेल्टा वा हामारीन [असेलस ऑस्ट्रॅलिस; होरा ८ ता. ४१ मि. ४५.६ से., क्रांती + १८० २०' ४१ .८; प्रत ४.१७; → ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति; प्रत] हा योग तारा असून तो क्रांतिवृत्तावर (सूर्याच्या आभासी वार्षिक गतिमार्गावर) आहे. याशिवाय कर्केतील गॅमा (असेलस बोरिॲलिस; प्रत ४.७३) आणि ईटा असे तारे यात येतात. डेल्टा व गॅमा यांच्या साधारण मधे नुसत्या डोळ्यांनी भासमान होईल असा प्रीसेपी (एम ४४ किंवा एनजीसी २६३२; होरा ८ ता. ३७.४ मि., क्रांती + २००; प्रत ३.७; अंतर ५२५ प्रकाशवर्षे) या नावाचा एक तारकागुच्छ आहे. याला मधुभक्षिका (मधाचे पोळे) असेही म्हणतात. या गुच्छात शेकडो तारे असून त्यांपैकी कित्येक सूर्यापेक्षा तेजस्वी आहेत. हा गुच्छही क्रांतिवृत्ताच्या अगदी जवळच आहे. याला कौस्तुभ असे प्राचीन नाव आहे. पुष्याला वेदकाली तिष्य असे म्हणत व त्याला सिध्य असेही एक नाव आहे. गुरुवारी चंद्राला पुष्य नक्षत्र असले, तर तो गुरुपुष्य (अमृतसिद्धी) योग समजतात. विवाहाखेरीज सर्व कामांसाठी हा योग लाभकारक मानला जातो. याची देवता बृहस्पती व आकृती शकट (किंवा खेकडा) आहे. काळोख्या रात्रीच मार्चच्या मध्यास रात्री ९ च्या सुमारास हे डोक्यावर दिसते. आकाशात ढग नसतानाही हा गुच्छ मंद झाला, तर पाऊस येतो अशी पूर्वी समजूत होती.
ठाकूर, अ. ना.(स्रोत: मराठी विश्वकोश)