पिशरनाथ महादेव मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिशरनाथ महादेव मंदिर हे महाराष्ट्रातील माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी स्थित एक शिव मंदिर आहे.  हे माथेरानमधील सर्वात जुने मंदिर आहे तसेच पिशरनाथ देवता ही माथेरानची ग्रामदेवता म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरातील लिंग हे स्वयंभू असून विलक्षण 'एल' अक्षराच्या आकारात आहे. तसेच हे लिंग शेंदुराने झाकलेले आहे. हेपिशरनाथ महादेव हे प्राचीन मंदिर आता "शार्लोट" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तलावाच्या काठावर आहे. मंदिराचा परिसर अत्यंत सुंदर आणि निर्जन आहे. पिशरनाथ महादेव मंदिर हे समुद्रसपाटीपासून सुमारे 2516 फूट उंचीवर आहे. माथेरान हे एक आकर्षक पर्यटन स्थळ असुन, अतिशय प्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण आहे.

संदर्भ[संपादन]