पिंपरी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिंपरी विधानसभा मतदारसंघ - २०६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, पिंपरी मतदारसंघात हवेली तालुक्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ७, १३ ते १८, ३१ ते ३७, ५२, ५४ ते ५८, ६१ ते ६६. ७४ ते ७९, ८७ ते ९० सीएमई ९९९ यांचा समावेश होतो. पिंपरी हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अण्णा दादू बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ अण्णा दादू बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ गौतम सुखदेव चाबुकस्वार शिवसेना
२००९ अण्णा दादू बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".