नरविलाप स्तोत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नरविलाप या स्तोत्राची मुद्रित प्रत सर्वप्रथम महंत दत्तराज यांनी (पेशावर-लाहोर) येथे १९०० मध्ये छापून प्रसिद्ध केली होती. नंतर डॉ. वि.भी कोलते यांनी ती प्रत संशोधित करून १९८७ मध्ये प्रकाशित केली. या प्रतीमध्ये त्यांनी मूळ १२० श्लोक संस्कृत मध्ये तसेच छापून त्यातच त्यांनी  १९ व्या शतकातील लक्ष्मीधर शेवलीकर यांची नरविलाप मराठी ओवीबद्ध २४३ओव्याची टीका छापलेली आहे. तसेच या स्तोत्रा संबंधी सर्व बाबींचे चिकित्सक अध्ययन केले आहे.  याच  मराठी टीकेचा अर्थ चक्रपाणी बिडकर सातारा यांनी २०१५ मध्ये प्रकाशित केला आहे. याव्यतिरिक्त १६ व्या शतकातील कवी गुंडमुनी महानुभाव यांची एक संस्कृत टीका प्रसिद्ध आहे. ही टीका गद्य स्वरूपात असून ती अजूनही अप्रकाशित आहे. तसेच हरिराज पूजदेकर यांचीही एक टीका आहे परंतु ती कोठेही पहावयास मिळालेली नाही. फक्त त्याची नोंद वि.ल.भावे यांच्या महानुभाव कवी काव्य सूची मध्ये आली आहे.