धारित्र
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
धारित्र (अन्य नावे: विद्युतधरित्र, विद्युतधरणी ; इंग्लिश: Capacitor (कपॅसिटर), condenser (कंडेन्सर) ;) हा एका विद्युत-अपारकाने अलग केलेल्या दोन विद्युतवाहकांपासून बनलेला निष्क्रिय इलेक्ट्रॉनिक घटक असतो. दोन वाहकांदरम्यान वर्चोभेद (व्होल्टेज) असल्यास, त्यांच्यामधील विद्युत-अपारकात ऊर्जा साठवून ठेवणारे स्थिर विद्युतक्षेत्र उद्भवते व त्यामुळे वाहकांदरम्यान यामिक बल निर्माण होते. धारित्राची ही ऊर्जा साठवून ठेवण्याची क्षमता धारिता या गुणधर्माने सूचित केली जाते. धारित्राच्या प्रत्येक वाहकावरील विद्युतभार व त्यांच्या दरम्यान असलेला वर्चोभेद यांचे गुणोत्तर म्हणजे धारिता होय. फॅराड या एककात धारिता मोजली जाते.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- हाउ स्टफ वर्क्स - धारित्रांचे कार्य कसे चालते, याविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)