धर्मनिरपेक्षता
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
भारतीय घटनेच्या २५व्या कलमाने धर्मनिरपेक्षतेचा अर्थ स्पष्ट केला आहे.
- भारतातील कोणत्याही व्यक्तीला त्याला योग्य वाटणाऱ्या उपासनेचा, धर्मपालनाचा, पारलौकिक कल्याणाचा, आध्यात्मिक उन्नतीचा पूर्ण अधिकार आहे.
- वरील अधिकारात धर्माच्या नावावर सरकार हस्तक्षेप करणार नाही तसेच मदत व विरोधही करणार नाही.
- सामाजिक व राजकीय जीवनात व्यक्ती-व्यक्तीमध्ये धर्माच्या नावाने भेदभाव केला जाणार नाही.
मात्र संकुचित अर्थानेही धर्माचा नाश घडवून आणणे, धर्माला जीवनातून हद्दपार करणे असा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ नाही. सामाजिक व्यवहारात धर्माला प्रवेश नाही. एवढाच धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे असे मानले जाते.
[संपादन] आक्षेप
या धर्मनिरपेक्षतेचा फायदा घेऊन ख्रिस्ती मिशनरी हिंदू लोकांच्या धर्मांतराचे काम करतात, असा आक्षेप यावर घेतला जातो. तसेच धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लीम अनुनय केला जातो असेही मानणारा एक प्रवाह आहे. जगात भारत हा एकमेव देश धर्मनिरपेक्ष आहे. बाकी सर्व राष्ट्रांना त्यांचा राष्ट्रीय धर्म आहे. जसे,
- ऑस्ट्रेलिया अधिकृत धर्म ख्रिस्ती
- स्पेन अधिकृत धर्म ख्रिस्ती
- इटली अधिकृत धर्म ख्रिस्ती
- फ्रांस अधिकृत धर्म ख्रिस्ती
- बहारीन अधिकृत धर्म इस्लाम
- मलेशिया अधिकृत धर्म इस्लाम
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |